Friday, February 26, 2021
Home Maharashtra News अखेर भरती प्रक्रियेला ग्रीन सिग्नल

अखेर भरती प्रक्रियेला ग्रीन सिग्नल

विधानसभा निवडणुकीमध्ये आरोग्य विभागाच्या या रखडलेल्या जाहिरातीचा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर महाआघाडीचं सरकार आल्या नंतरची ही पहिलीच सर्वात मोठी जाहिरात आहे. त्यामुळे दीर्घकाळ नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना दिलासा मिळाल्याचं दिसतं.  राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत ८५०० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण १७ हजार पदांपैकी ५० टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी २०१९ साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील. या पदभरतीचा तपशील आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. रखडलेली ही जाहिरात प्रसिद्ध करुन राज्य सरकारने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येतं आहे.

राज्याच्या ग्रामविकास खात्याकडे आरोग्य विभागाची जी जवळपास दहा हजार पदे आहेत ती आणि आरोग्य खात्याची स्वत: ची सात हजार पदे अशी एकूण सतरा हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी आता ५० टक्के पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येतंय. फेब्रुवारी २०१९ साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील.

कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे. पद भरती तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा तातडीने घेणे आवश्यक असल्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पद भरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील. सामान्य प्रशासन विभागाने आरोग्य सेवेतील ५० टक्के रिक्त पदांवरील पद भरती प्रक्रियेस मान्यता दिली असल्याने www.mahapariksha.gov.in व www.arogya. maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर नियुक्ती प्राधिकारी निहाय रिक्त पदांचा तपशील प्रसिद्ध केला आहे. सदर प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासन स्तरावर राखून ठेवण्यात आले आहेत. पदभरतीबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल रह झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. सदर प्रसिध्द झालेल्या जाहिरातीसाठी पुढच्या महिन्यात, फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येतील असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. २८ फेब्रुवारी २०२१  रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments