Monday, March 1, 2021
Home Maharashtra News सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आगीचा भडका

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आगीचा भडका

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी ही आग लागल्याचं स्पष्ट झालं. मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूटचा हा नवीन प्लांट आहे. “मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरु होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात  आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत,” असं राजेश टोपे म्हणाले. राजेश टोपेंनी सांगितलं की, “कोरोना लस निर्मिती जिथे होते ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळे लसीचं कुठलंही नुकसान नाही. यासंदर्भात पोलीस तपास सुरु आहे.” अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे.  पुढे पवार म्हणाले,  ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. उद्या पासून  यासंबंधी ऑडिट सुरू होणार आहे,  आत पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आग लागल्यानंतर आतील स्प्रिंकल चालू झाले होते, पण आग भडकल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. सीरम इन्स्टिट्यूटचा परिसर sez आहे. याठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली का याचाही तपास केला जाईल. वेल्डिंग सुरू असल्यामुळे आग लागली असे सांगण्यात येत आहे.

आग लागलेल्या इमारतीत ४ जण अडकले होते. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे. कोविशिल्ड  लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments