Monday, March 1, 2021
Home Maharashtra News महाराष्ट्रात निवडणुका निकालाचा डंका

महाराष्ट्रात निवडणुका निकालाचा डंका

महाराष्ट्रात एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्या असून शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आज ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होत असून, राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक २७८  जागा आहे. भाजपने २५९ जागा पटकावल्या आहे. तर राष्ट्रवादीने २१८ जागा पटकावल्या आहे. काँग्रेसने १२५ जागा जिंकल्या आहे. तर मनसेला सुद्धा खाते उघडता आले आहे. मनसेनं ५ ठिकाणी आपला बिनविरोध झेंडा फडकावला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक अनेक ठिकाणी बिनविरोध झाली आहे. त्याची आकडेवारी आता समोर आली आहे. जवळपास १४१० जागा या बिनविरोध झाल्या. राज्यातील सत्तेचं समीकरण पाहता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी सर्वाधिक ठिकाणी बिनविरोध निवडून आले आहे. पाहूया काही ठिकाणची निकाल स्थिती.

अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेवाळीमध्ये शिवसेनेला हादरा बसला आहे. ११ पैकी ९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या आहेत. नेवाळी ग्रामपंचायतीमध्ये १३ जागा होत्या, त्यामधील दोन प्रभागात बहिष्कार असल्याने ११ जागांवर निवडणूक होणार होती. मात्र ११ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये शिवसेना एक तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध आले. उर्वरित आठ जागांवर निवडणूक झाली यामधील एका जागेवर शिवसेना तर उर्वरीत सात जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले.

नितेश राणेंनी वैभववाडीचा गड राखला आहे. नितेश राणेंच्या मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील एकूण १३ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे तर शिवसेनेला अवघ्या ४ ग्रामपंचायती मिळाल्या आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव असलेल्या राळेगणसिद्धिमध्ये अण्णा हजारेंचा पाठिंबा असलेल्या ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. राळेगणसिद्धिमधील ९ पैकी ५ जागांवर ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे.

रत्नागिरीच्या दापोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका जागेवर वर्चस्व. नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.

मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का, ६ पैकी ५  ग्रामपंचायतींमध्ये भाजपची एकहाती सत्ता. चिंदर, पेंडुर, गोळवण, कुंनकवळे, मसदे ग्रामपंचायतीत भाजपचा झेंडा फडकला.

भाजप नेते नारायण राणे यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या कणकवली तालुक्यात तीनही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले  आहेत. परंतु, याठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व दिसून आले. कणकवलीत दोन ठिकाणी शिवसेना, तर एका ठिकाणी भाजप विजयी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

चंद्रकांत पाटील यांचा मूळगावी देखील पराभव, शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली, खानापुरात शिवसेनेला ६ जागा तर अजून तीन जागांची मतमोजणी सुरु आहे.

महाराष्ट्रभरात गावाला ओळख देणारे विकास पुरुष भास्कर पेरे-पाटील यांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे.  भास्कर पेरे-पाटील यांचा तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी नवीन कोणाला तरी संधी मिळावी म्हणून निवडणुकीतून निवृत्ती घेतल्याचे सांगितले होते. त्यामुळे अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.

१५ तारखेला मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या १ लाख २५ हजार ७०९ जागांसाठी एकूण ३ लाख ५६ हजार २२१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर २ लाख ४१ हजार ५९८ उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी २६ हजार ७१८ उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिम २ लाख १४  हजार ८८० उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments