Monday, March 1, 2021
Home Maharashtra News हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा

हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्याबद्दल फेडरेशन ऑफ हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एफएचआरएआय चे उपाध्यक्ष गुरबक्सीश सिंह कोहली, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, एचआयएचे अध्यक्ष भाटिया, चटवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे आणि पर्यटन क्षेत्र बंद असताना त्यांना चालना देण्यासंदर्भात शासन स्तरावर सातत्याने चर्चा सुरु होती. त्यातून पर्यटन विभागाच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात बदल करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देऊन पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना देता येईल यावर एकमत झाले. हॉटेल उद्योगासाठी लाभदायक ठरणार आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस च्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या अधिक सुलभ रितीने मिळण्यासाठी ‘सिंगल स्टॉप’ तसेच ‘डेस्क’ या संकल्पना सुरु करण्याचा विचार शासन करीत असून परवाने प्राप्तीसाठी ही संकल्पना प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Maharashtra Tourism

कोविड-१९ नंतर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईसारख्या महानगरामध्ये आठवड्याचे सात दिवस, २४ तास सेवा उपलब्ध करण्याची परवानगी देण्यात आली. राज्य शासन पर्यटन क्षेत्राला आणि त्याच्या विकासाला नेहमी प्राधान्यक्रम देत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर काम चालू आहे. सत्काराला उत्तर देताना ठाकरे यावेळी म्हणाले, कोविड महामारीच्या काळात हॉटेल व्यावसायिकांनी मोलाची कामगिरी केली आहे. डॉक्टर्स, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ हे सातत्याने संकटाला तोंड देत होते. अशा वेळी त्यांना सोयीसुविधा देऊन, अतिथी देवो भव या निस्वार्थी भावनेने त्यांच्या निवासाची सोय करुन हॉटेल असोसिएशनने मोलाचे सहकार्य केले.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि संकल्पनांची देवाणघेवाण करुन नवनवीन गोष्टी प्रत्यक्षात निर्माण करून उद्योगांना चालना मिळवून देऊ. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी नुकतेच बृन्हमुंबई महानगरपालिकेत हेरिटेज वॉक ही संकल्पना सुरु केली आहे. त्याप्रमाणे आगामी काळात व्हिंटेज कार म्युझियम, वॉकिंग टूर, गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण अशा विविध संकल्पना आगामी काळात राबविण्यात येणार आहेत. संधीचा उपयोग करुन महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments