Saturday, March 6, 2021
Home Maharashtra News आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस विजेते पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस विजेते पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

फ्रान्समधील आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस ही स्पर्धा अत्यंत खडतर अशी समजली जाते. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त IPS  कृष्ण प्रकाश यांच्या नावाची नोंद आता ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली आहे. त्यांनी २०१७ साली जगातली सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ ही स्पर्धा जिंकली. कृष्णप्रकाश यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली. अशा प्रकारचे ते भारतातील पहिलेच वर्दीधारक अधिकारी असल्याने तशा प्रकारचे प्रमाणपत्रक कृष्णप्रकाश यांना देण्यात आले. त्याचे फोटो कृष्णप्रकाश यांनी बुधवारी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन शेअर केले. या स्पर्धेमध्ये ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे असे प्रकार केवळ १६ तासात पूर्ण करायचे असतात. ते खेळाडूंसाठी एक प्रकारचं आव्हान असल्याचं समजलं जातं. त्यासाठी जगातील अनेक खेळाडू मेहनत घेतात. पण खूप कमी लोक ही स्पर्धा पूर्ण करु शकतात. ही स्पर्धा जिंकण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. पोलीस दलातील एक दमदार अधिकारी अशी ओळख कृष्णप्रकाश यांची आहे. त्यांची पोस्टिंग ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात ते यशस्वी होतात. कृष्णप्रकाश यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे.

पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताना आपल्या मुलाखतीत सांगितले, शहरात ९९ टक्के लोक कायदा पाळतात परंतु, एक टक्का लोकांमुळे गुन्ह्यांना चालना मिळून ते घडविले जात आहेत. याप्रकारच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे कायदा सर्वांना सारखा असून, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही’, अशा शब्दांत बजावले. तसेच दिशाहीनतेमुळे काही बाल गुन्हेगार असू असतात. या सर्वांना आधी समजावण्याचा प्रयत्न करणार. तरीही ते गुन्हे करीत राहिले तर मग कारवाई करणार, असा सक्त इशाराचं आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला. समस्येचे कारण जाणून घेऊन कारवाईला सुरुवात करणार. महिला, वृद्ध, बालके यांच्यासाठी एनजीओ च्या मदतीने काम करणार आहे. प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्याकडून शहर आणि त्यांच्याही समस्या जाणून घेणार आहे. झीरो टॉलरन्स हे माझे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

जगातली सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ ही स्पर्धा त्यांनी जिंकली. अशी कामगिरी करणारे ते भारतातील पहिलेच पोलीस अधिकारी आहेत. या आधी भारतीय सैन्य, निमलष्करी दल किंवा पोलीस सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्याला ही कामगिरी पार पाडता आली नव्हती. कृष्ण प्रकाश यांनी हा सन्मान देशाला, पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांना, कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांना अर्पण केल्याचं सोशल मीडियाच्या पोस्टमधून सांगितलं आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments