Friday, February 26, 2021
Home Maharashtra News जिजाऊंच्या जन्मस्थानी काळोखाचे साम्राज्य

जिजाऊंच्या जन्मस्थानी काळोखाचे साम्राज्य

१२ जानेवारीला जिजाऊंचा जन्मसोहळा असून यावर कोरोनाचे सावट आहे. कमी लोकांमध्ये सोहळा पार पाडण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे, यासाठी अनेक मान्यवर येणार आहेत. ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित झालेले जिजाऊ जन्मस्थान पुरातत्व विभागाच्या देखरेखी खाली आहे. चार दिवसांवर आलेल्या जिजाऊ जन्म उत्सवासाठी महाराष्ट्राची अस्मिता असलेला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेला राजवाडा अद्याप बंदच आहे. एवढंच नाहीतर या वाड्यात रात्री काळोखाचे साम्राज्य बघायला मिळत आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये सरकारनं आध्यात्मिक स्थळ, पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी उघडली आहेत. मात्र कोरोनाच्या नावाने बंद केलेली ऐतिहासिक स्थळं अजूनही बंदच असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जन्मस्थळ असलेल्या राजवाडा गेल्या मार्च पासून अंधारात तर दुसरीकडे जिजाऊ यांच्या नावाने साजरा होणाऱ्या उत्सवाचे स्थान दोन किलोमीटर वरील जिजाऊ सृष्टि वर मात्र मराठा सेवा संघाने मोठी लखलखाट विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. कोरानाचे निर्बंध फक्त जिजाऊ जन्मस्थळालाच का, जिजाऊ सृष्टिला नियम नाहीत का ? ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावावर निवडणुकांचे प्रचार केले जातात. बऱ्याचदा यांच्या नावाचा उपयोग राजकारणासाठी वरचे वर केल्याचं पाहायला मिळतं. पण त्याच अस्मितेचा राज्यकर्त्यांना कालांतराने विसर पडल्याचं पाहायला मिळतं.

jijamata painting

येत्या १२ तारखेला राजमाता जिजाऊंचा जन्म उत्सव आहे. जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजेच, बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा येथे मराठा सेवा संघातर्फे सर्वात मोठा उत्सव दरवर्षी साजरा होत असतो. पण यावर्षी कोरोनामुळे हा सोहळा छोटेखानी कार्यक्रमात होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. असं असलं तरी या कार्यक्रमात मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कारा यावर्षी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सिंदखेड राजा येथील कार्यक्रम स्थळ जिजाऊ श्रुष्टी आतापासून दिव्यांच्या झगमागाटात सजविली गेली आहे. पंरतु जवळच असलेलं जिजाऊंचं मुळ जन्मस्थळ अजूनही अंधारात आणि टाळेबंद स्थितीत आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्व विभागाच्या देखरेखीत आहे. पण जिजाऊंच्या जन्म सोहळ्यासाठी या परिसराची साधी साफसफाई किंवा एखादा दिवा सुद्धा लावण्याचं कार्य पुरातत्व विभागाने दाखविलं नाही. एकीकडे झगमगाट तर मुळ जन्मस्थळ अंधारात अशी काहीशी स्थिति बघवायास मिळते आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments