Friday, February 26, 2021
Home Maharashtra News ३१ डिसेंबर च्या न्यू इअर ब्लाशवर निर्बंध

३१ डिसेंबर च्या न्यू इअर ब्लाशवर निर्बंध

आज २० व्या शतकाचा शेवटचा दिवस आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. तर मुंबईतील गार्डन आणि रस्त्यावरही गर्दी करण्यास मनाई घालण्यात आली आहे. दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केलं आलं आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि मद्यपान करून गाडी चालवत असाल तर फक्त तुमच्यावरच नाही तर गाडीत तुमच्यासोबत असणा-यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता मद्यपानाचे सेवन करून गाडी चालवणाऱ्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे आणि जर त्यांनी मद्यपानाचे सेवन केलं असेल तर त्यांच्यावर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाडीत असणाऱ्या सहप्रवाशांविरुद्ध सुद्धा पेंडमिक अॅक्टनुसार कारवाई केली जाईल.

२० व्या शतकाला निरोप देताना जल्लोष करण्यासाठी सरकारकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचार बंदी लागु करण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन, गिरगाव चौपाटी सरख्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. रात्री १ वाजल्यानंतर जेवण पार्सल सुद्धा मिळणार नाही. त्याचप्रमाणे महाबळेश्वर पाचगणीच्या पर्यटकांवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी रोख लावला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरात रात्री पर्यटकांना दहा नंतर बाहेर फिरता येणार नाही. कोणता कार्यक्रम करता येणार नाही. पार्टी करता येणार नाही त्यामुळे ३१ डिसेंबरसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा फटका बसणार आहे. कर्नाटक सरकारने राज्याची राजधानी बंगळुरुमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री आणि १ जानेवारीच्या सकाळी पार्ट्यांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. तर गोव्यात देखील काहीसे निर्बंध घालण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक आले आहेत. परंतु काहीशी त्यांच्या पदरात निराशा पडण्याची शंका व्यक्त होते आहे.

दिल्लीमध्येही ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जल्लोष करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक जागांवर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments