वैभववाडी नगरपंचायतमधील ७ राणे समर्थक नगरसेवकांना सेनेत प्रवेश होत आहे. नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते सेनेत प्रवेश करत आहेत. सर्व सात माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आहेत. नितेश राणे कालपर्यंत त्याच्या परिवारावर दबाव टाकत होते. त्यांना तिकिट दिलं जाणार नाही असं बोलणं चुकीचं ठरेल, असं सतीश सावंत यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेले. त्यानंतर वाभदे वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. वाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. १७ पैकी १७ नगरसेवक हे भाजपकडे होते. मात्र काल त्यातील ७ नगरसेवक फुटून आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहेत.
Dear Uddhavji,
Happy Valentines Day !Love : Nitesh Narayan Rane 😅 pic.twitter.com/BOEiAnmBMq
— nitesh rane (@NiteshNRane) February 9, 2021
रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संपदा राणे, रवींद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर, संतोष पवार, दीपा गजोबार या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी बातमी मी वाचली आहे. व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं, असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्याची परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे उमेदवारीसाठी मुळ शिवसैनिक सापडणार नाही. शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळं शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नये, अशी माझ्या सारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हॅलेंटाइन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय, असा मिश्किलपणे टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना मारला आहे. उद्या तिथं निवडणूक लढवायलाही शिवसैनिक उरला नाही म्हणून कोणी राणेंकडे बोट दाखवायला नको. कारण शेवटी कोकणात शिवसेना ही नारायण राणेंनीच बनवली होती.
नितेश राणेंचा हा व्हिडिओ सध्या चर्चेला विषय ठरत आहे. मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत मेडिकल कॉलेजच्या फाईलवर सही केली, आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही, दिलं तरी घेणार नाही, फुलांचा गुच्छ दिला तर ते स्विकारणार नाहीत. त्यामुळं हे सात नगरसेवक त्यांना आभार आणि धन्यवाद मानण्यासाठी पाठवत आहे. त्याचा स्वीकार करावा, असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.