Monday, March 1, 2021
Home Maharashtra News वाढीव वीज बिलाबाबत मनसे आक्रमक

वाढीव वीज बिलाबाबत मनसे आक्रमक

"लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे, नागरिकांना तिप्पट वीजबिल आकारण्यात आला, त्याविरोधात आम्ही आवाज उठवणार," अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

“काही झाले तरी वाढीव वीजबिलं भरू नका“ असं आवाहन मनसेने जनतेला केले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वीज बिलाचा मुद्दयावर चर्चा केली. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांना वाढीव वीजबिलं आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता काही जणाच्या नोकर-या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. उदरनिर्वाहाची सर्वच साधने बंद झाल्याने काहीच उत्पन्न हातात नसल्याने आणि त्यात मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे गेले ७ महिने बंद असल्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. अशा परिस्थितीत वाढीव विजबिलांमुळे मिळालेला शॉक खूपच भयंकर होता. ह्या संदर्भात माझे सहकारी वीजमंत्र्यांना भेटून आले, आम्ही आंदोलनं केली, पण सरकार अजूनही ह्यात मार्ग काढायला तयार नाही. सरकारनं वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढी रक्कम परत करायला हवी,” अशी भूमिका मनसेनी मांडली होती.

ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी २६ नोव्हेंबरला मनसेने राज्यभरात मोर्चे काढले आहेत. मनसेने मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या प्रमुख शहरात मोर्चे काढले आहेत. आज सकाळपासूनच राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी विविध सरकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. जिल्ह्यातील नेत्यांनी वाढीव वीजबिल माफीबाबतचं पत्र जिल्हाधिकारी किंवा वरीष्ठ अधिकाऱ्यांना द्यावं, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं जाणार आहे. बहुतांश ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. पण तरीही मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन मोर्चा काढला. “लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे, नागरिकांना तिप्पट वीजबिल आकारण्यात आला, त्याविरोधात आम्ही आवाज उठवणार,” अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचाही सहभाग झाल्याचं दिसून आले. “आम्हाला संघर्ष जरी नवीन नसला तरी ही वेळ संघर्षाची नाही याचं भान सरकारने देखील बाळगून उगीच वाढीव वीजबिल पाठवून संघर्ष वाढवू नये. या विषयांवर समंजस भूमिका घेत, वीजदेयकांबाबत सवलत देत नागरिकांना दिलासा द्यावा, हीच सरकारला विनंती,” असं या पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी लिहिलं आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरसह इतर मोठ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मनसेचे वीज बिल विरोधी आंदोलन पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments