Friday, February 26, 2021
Home Maharashtra News राजकीय नेत्यांची सुरक्षेत कपात

राजकीय नेत्यांची सुरक्षेत कपात

कोविड काळात पोलिसांवर खूप कामाचा बोजा आलेला होता. त्यामुळे विरोधी पक्षांचा नेत्यांचा सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्युरिटी रिव्ह्यू मिटींग झाली. ही मिटींग दर एक ते दोन महिन्यांमध्ये होते. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्यावर नक्कीच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुरक्षा कमी केल्यानंतर म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो त्यावेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरुन माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. या सरकारला असं वाटत असेल की आता सुरक्षेची गरज नाही. मला सुरक्षेची गरज नाही,  मी फिरत राहणार. मला चिंता नाही, माझी कुठलीही तक्रार नाही, मी जनतेतला माणूस आहे, त्यामुळं माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, सरकार कोणत्या भावनेने हे करतंय, त्याचा उद्देश मला माहित नाही. केवळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील याचंच नव्हे तर माझ्यासह अनेक प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढली. पण याबाबत आम्ही सरकारकडे दाद मागणार नाही. कारण आमचं संरक्षण पोलीस करते असं नाही तर राज्यातील जनता आमची सुरक्षा करते. त्यामुळे सुरक्षेत कपात केल्याने आमच्या कामात तसूभर ही फरक पडणार नाही आणि आम्ही हादरणारही नाही, असं ते म्हणाले.

भाजप खासदार नारायण राणे म्हणाले की, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. यापूर्वी देखील माझी सुरक्षा कमी कमी करण्यात आली होती, मला काही फरक पडत नाही माझ्याकडे केंद्राची सुरक्षा असल्याचं राणे यांनी म्हटल आहे.

चंद्रपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे आणि दारूबंदीमुळे मला ज्या धमक्या मिळत होत्या त्यासाठी सुरक्षा दिली होती. सुरक्षा एक एक ग्रेडने कमी केली जाते पण सरकारने एकदम शून्य केली. सरकारला मनापासून धन्यवाद की राज्य एकदम सुरक्षित आहे म्हणून ही सुरक्षा काढली, असा टोला भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मारला.

ठाकरे सरकारनं घेतलेला हा निर्णय सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकार नेत्यांची सुरक्षा कमी करत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम म्हणाले की, गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश दाखवून दिलं. ना हे शेतकऱ्यांना मदत करु शकले, ना कोरोना काळातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही मदत करु शकले. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिलं त्या कोकणात आलेल्या चक्रीवादळानंतरही कोणतीही मदत करण्यात आली नाही. त्यामुळे सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.” अशा एक ना अनेक प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments