Monday, March 1, 2021
Home Maharashtra News शक्ती कायदा ठरणार महिलांसाठी दिशादर्शक

शक्ती कायदा ठरणार महिलांसाठी दिशादर्शक

आंध्र प्रदेशने महिलांवरील अत्याचाराचे खटले जलद गतीने चालवून निकाली काढण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी वेगाने खटला चालविणे, २१ दिवसात निकाल देणे आणि गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना रोख बसण्याची शक्यता आहे. महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून कठोर कायदा आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी नुकतीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती. महिला व बालकांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी शक्ती नावाचा कायदा करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.

महिला अत्याचारावरुन आज अधिवेशनात पडसाद उमटले. या विषया संदर्भात बोलताना ते म्हणाले की, महिला अत्याचार प्रकरणांमध्ये ७ दिवसाच्या आत तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल होणे. चौदा दिवसात खटला पूर्ण होऊन निकाल देणे अशा तरतुदी आहेत. दिशा कायद्याविषयी व्यवस्थित माहिती घेऊन अहवाल देण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती दोरजे यांच्या नेतृत्वाखाली ५ अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. ते पुढील आठवड्याभरात अहवाल देतील. त्यावर चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येईल. तसेच अधिवेशनात याबाबतचा कायदा प्रयत्न करू, असे आधी देखील देशमुख यांनी म्हटले होते. दरम्यान याच विषयावरुन आज विधानपरिषदेमध्ये देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. उदाहरणादाखल हिंगणघाटसह राज्यातील अन्य अनेक महिला अत्याचारांच्या घटनांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला. शिवाय, या अधिवेशनातच सरकार दिशा कायदा आणणार का? असा सवालही दरेकर यांनी विचारला. अजेंड्यामध्ये नसले तरी दिशा कायदा आणा, आम्ही समर्थन देऊ असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी सरकारला सांगितला. त्यावर महिला अत्याचाराबाबत सरकार गंभीर आहे आणि कायद्यासंदर्भातही वेगानं हालचाली सुरु असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

काय असतील दिशा कायद्याच्या तरतुदी, पाहूया थोडक्यात.

दिशा कायद्याखाली महिलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार, सामुहिक बलात्कार, बालकांवरील अत्याचाराचे पोक्सो कायद्याखालील गुन्हे, विनयभंग, ॲसिडहल्ला आदी ५ प्रकारची प्रकरणे चालतात. सात दिवसाच्या आत तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल होणे, चौदा दिवसात खटला पूर्ण होऊन निकाल, ४५ दिवस अपीलासाठी वेळ विशेष न्यायालय फक्त बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण, अत्याचार, अॅसिड हल्ला, विनयभंग या प्रकरणांसाठी प्रत्येक जिल्ह्यात या कायद्याखालील गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष तपासणी पथके असून महिला पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली त्याचा तपास केला जातो. प्रत्येक तक्रार देत असतानाचे दूरचित्रीकरण केले जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments