Sunday, March 7, 2021
Home Maharashtra News शाहंना शिवसेनेकडून सडेतोड उत्तर

शाहंना शिवसेनेकडून सडेतोड उत्तर

सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रयत्नांनी साकारण्यात्य आलेल्या त्यांच्या वैद्यकिय महाविद्यालयाचा उदघाटन लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी भाजपच्या बड्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या महाविद्यालयाच उदघाटन करण्यात आलं. ज्यानंतर व्यासपीठावर आलेल्या भाजपच्या प्रत्येक नेत्यानं शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. नारायण राणे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली. भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती अस वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. शिवाय आम्ही दिलेली वचनं पाळतो असं म्हणत त्यांनी सत्तास्थापनेची बिघडलेली समीकरणं पुन्हा एकदा सर्वांसमोर मांडली. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

रोहित पवार यांनी प्रतिक्रीया व्यक्त करत मुळात शाहंचं वक्तव्य हे व्यक्तीगत होतं. महाविकास आघाडी सरकार भाजपमधील कोणालाही पचनी पडलं नाही. शिवाय मागील अनेक वर्षांपासून युतीत असतानाही भाजपनं विश्वासघात केल्याची भावना शिवसेनेत होती. आणि महाविकास आघाडीचं सरकार जाईल असं पहिल्या दिवसापासून फडणवीस म्हणत होते मात्र अजूनही सरकार टिकून आहे. त्यामुळे दर तीन महिन्याला ते सरकार पडणार असं फडणवीस सांगतात, आपले आमदार जाऊ नये या भीतीने असं बोलले असावेत, असा सणसणीत टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेना संपुष्टात आली असती म्हणणाऱ्यांना कशा प्रकारे या पक्षानं वास्तविकतेचा चेहरा दाखवला याचं प्रमाण दिलं. ‘१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० मध्ये बहुतेक मुरली देवरा यांनी अशाच आशयाचं वक्तव्य केलं होतं की शिवसेना संपली. पुन्हा २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच काहीसं म्हटलं होत. पण, या दोन्हीही प्रसंगी शिवसेना आधीपेक्षा जास्त ताकदीनं उभी राहिली, असं राऊतांनी ट्विट करत शाहंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर केलं. जय महाराष्ट्र ! लिहित त्यांनी आपल्या उत्तराला अधिक जोर दिला. २५ वर्षांसाठी निवडणुकीच्या रिंगणात एकत्र राजकीय खेळी खेळणाऱ्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आता मात्र सर्वकाही विस्कळीत झाले आहे. राजकीय समीकरणं बिघडलेली असतानाच या दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी रविवारी शिवसेनेवर तोफ डागली. थेट शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत दावा करणाऱ्या शाहंना अखेर शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments