Friday, February 26, 2021
Home Maharashtra News मराठी मुलीचा ऑस्ट्रेलियामध्ये डंका...

मराठी मुलीचा ऑस्ट्रेलियामध्ये डंका…

ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी दरवर्षी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या ७ स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले राज सुरी यानी या सौंदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

shritika won miss india

ठाण्यातील प्रसिध्द डॉक्टर संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने हीने वयाच्या २० व्या वर्षी, ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धे’त विजेतेपद पटकावले आहे. श्रुतिका माने हिचा जन्म इंग्लडला झाला होता. त्यानंतर पुन्हा भारतात परतल्यावर ठाण्यातील सिंघानिया स्कूलमधून तिने पुढील शालेय शिक्षण पूर्ण केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून अॅडव्हान्स हेल्थ अँन्ड मेडिकल सायन्सचे पदवी शिक्षण घेत आहे. श्रुतिकाने कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून, शालेय जीवनात अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. याशिवाय तिला अभिनयाची देखील आवड आहे. २००१ मध्ये सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय रहिवासी राज सुरी यांनी ‘मिस इंडिया सौंदर्य स्पर्धे’ला सुरूवात केली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईत होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

श्रुतिकाचे वडील डॉक्टर संदीप माने व आई डॉक्टर राजश्री माने हे दोघेही आयव्हीएफ तज्ज्ञ आहेत. मुलीच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुलीच्या यशाबद्दल आम्हाला आनंद झाला असून, सध्या मुली सर्वच क्षेत्रात वरचढ होताना दिसत आहेत, मुली देखील प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. सर्व पालकांनी आपल्या मुलींच्या पाठीमागे खंबीर उभे राहून त्यांच्या अंगीभूत गुणांना आणि कर्तृत्त्वाला साथ दिली पाहिजे.

shruti mane wins australia's miss india award

त्याच प्रमाणे, आपल्या यशाबद्दल बोलताना श्रुतिका म्हणाली की, मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली, ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे, ज्याची जाणीव मला आहे. भविष्यात आणखी काय करता येईल, याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींबा मिळाला, त्यामुळे हे यश मी मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्यातील सामर्थ्य, धैर्य व कलागुण जगासमोर आणणे, हा या स्पर्धेत भाग घेण्याचा प्रमुख उद्देश होता, असे श्रुतिकाने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments