Friday, February 26, 2021
Home Maharashtra News संभाजीनगर नामांतरणाचा वाद चिघळला

संभाजीनगर नामांतरणाचा वाद चिघळला

औरंगाबाद शहराच्या नामांतरणाच्या प्रकरणामुळं राज्यातील वातावरण तापले आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसनं विरोध केला आहे. काँग्रेसच्या विरोधानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं पुन्हा महाविकास आघाडीतील अंतर्गंत वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपनं केलेल्या या टीकेवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्याचे महसूल मंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला काँग्रेसचा विरोधच असेल, हा दावा त्यांनी केला. यावर भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील वगैरे लोकांनी विचारला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने नामांतरास विरोध केल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यात भूमिका स्पष्ट करण्याचसारख काहीच नाही, असे म्हणत शिवसेनेने आपली भूमिका बदललेलीच नसल्याचं तसेच ‘बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले आहे. राहिला प्रश्न कागदपत्रांचा त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. ‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसनं विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे,’ असं स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे.

सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करुन टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळं आता संभाजीनगरमुळं महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कोणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत,’ असं स्पष्ट करतानाच शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. पण राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचं सरकार हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारावर चालतात कोणत्याही वैयक्तिक अजेंड्यावर नाही. हा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे नावं बदलण्यासाठी नाही,’ अशी टीका निरुपम यांनी केली आहे.

‘छत्रपती संभाजी महाराज महान योद्धा होते आणि त्यांनी केलेलं आत्मसमर्पण वंदनीयचं आहे यात काही शंकाच नाही. पण सरकार चालवत असताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणत असेल तर यात त्यांचंच नुकसान होईल,  असा सूचक टोला निरुपम यांनी लावला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments