Friday, February 26, 2021
Home Maharashtra News हाफकिन इन्स्टिट्यूटने हायटेक व्हावं – उद्धव ठाकरे

हाफकिन इन्स्टिट्यूटने हायटेक व्हावं – उद्धव ठाकरे

मानवी सेवेस समर्पित असणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन आणि जीव औषध निर्माणात योगदान दिले आहे. हाफकिन संस्था येत्या काळात नावा रुपाला आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने हाफकिन इन्स्टिट्यूटमार्फत येत्या ५ वर्षात ५ प्रकल्पांसाठी १,१०० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. हे पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा पूर्ण पाठिंबा असून येत्या १५ दिवसात याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा. या आराखड्यामध्ये नेमका कोणता प्रकल्प प्रथम हाती घेतला जाऊन त्याची आवश्यकता, कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे, यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे नियोजन तसेच राज्य शासनाकडून आवश्यक असणारा निधी याबाबत या आराखड्यामध्ये संपूर्ण तपशील असावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,  हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक सीमा व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हाफकिन इन्स्टिट्यूटचे मुख्य काम हे विविध आजारांवरील लस निर्मिती आणि संशोधन करणे हेच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर संशोधनाला प्राधान्य देणे आवश्यक असून यासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य राज्य प्रशासनामार्फत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था मुंबई परळ येथे आहे. प्लेग रिसर्च लॅबोरेटरी नावाच्या बॅक्टेरियोलॉजी रिसर्च सेंटर म्हणून डॉ. वाल्देमार मोर्डेकाई हाफकिने यांनी १० ऑगस्ट १८९९ रोजी याची स्थापना केली. हे आता विविध मूलभूत आणि उपयोजित बायो-वैद्यकीय विज्ञान सेवा देते. संस्थेने मार्च २०१४ मध्ये सूक्ष्म जीवशास्त्रातील संशोधन आणि घडामोडी प्रदर्शित करण्यासाठी संस्थेच्या आवारात एक संग्रहालय उघडले आणि संस्थेच्या इतिहासाची माहिती दिली. संस्थेला २०१२ मध्ये आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र मिळाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्यदायी उत्पादनाची निर्मिती व पुरवठा करणे यावर भर देताना येणाऱ्या काळात हाफकिन इन्स्टिट्यूटने औषध निर्माणाबरोबरच कोविडसाठीची लस निर्मिती करण्याबरोबरच विविध संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी आयसीएमआर आणि भारत बायोटेक कडून कोविड लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठीही प्रयत्न करण्यात यावा. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेत अद्ययावत व्हॅसिन रिसर्च सेंटर स्थापन करण्यासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments