Salmon Fish in Marathi – रावस मासा

Salmon Fish in marathi
Rawas Fish

Salmon fish in Marathi अर्थात मराठी भाषेत Salmon माशाला “रावस मासा” म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सुरमई Kingfish माशा नंतर सर्वात जास्त चवीने खालला जाणारा मासा म्हणून रावस मासा Salmon Fish प्रसिद्ध आहे.

रावस मासा Salmon Fish in Marathi

भारतामध्ये विविध प्रकारचे, संस्कृतीचे, विचारांचे, खाद्य संस्कृतीचे लोकं वास्तव्य करतात. थोड्या थोड्या अंतरावर संस्कृती बदललेल्या आढळतात. आज आपण मत्साहारी लोकांच्या आवडीनिवडी थोडक्यात पाहूया. काही शाकाहारी असतात, तर काही मांसाहारी, काही फक्त अंड खाणारे त्यांना अंडाहारी म्हणायला हरकत नसावी आणि काही त्यापेक्षा थोडे वेगळे म्हणजेच मत्साहारी. फक्त आणि फक्त वेगवेगळ्या प्रकारचे माशांचा आस्वाद चवीचवीने घेणारे. कोकणाला लाभलेला भव्यदिव्य समुद्रकिनारा त्यामुळे कोकणकरांच जेवण माशाच्या घासाशिवाय पूर्ण होणे अशक्यच.

रावस मासा कुठे मिळतो 

कोकणामध्ये सुरमई, बांगडा, पापलेट, रावस, ताव्ज, मोडवसा, सरंगा, कोलंबी, खेकडे, बोंबील, सुकी मच्छी असे एक ना अनेक प्रकारचे मासे वेगवेगळ्या साईझ मध्ये मिळतात. आज आपण प्रोटीनयुक्त रावस (salmon fish) माशाबद्दल माहिती बघणार आहोत. Salmon Fish असे त्याला इंग्रजी नाव आहे. चवीला ए कदम बेफाट असणारा हा मासा मुंबई व कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतोही आणि खाल्लाही जातो. मिळालेल्या माहितीनुसार जशी कोलंबीची शेती केली जाते तशीच सध्या लोक रावस माशाच्या शेती व्यवसायात देखील उतरले आहेत.

Salmon Fish in Marathi
Indian Salmon Fish in Marathi

रावस माश्याच्या रेसिपी Salmon Fish Recipe

रावस माशांपासून वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवता येतात. कोकण किनारपट्टी आणि माश्यांचे बनविलेले वेगवेगळे प्रकार पाहून नक्कीच जिभेचे चोचले पूर्ण होतात. माशाचे लोणचे, माशाचे तिखले, सुके मासे, कटलेट, मोमोज असे एक ना अनेक पदार्थ आणि त्याच्या रेसिपीज नेटवर मिळून जातात. पाहूया २ कोकणातीलच माशांच्या कालवणाची आणि फ्राय करायची रेसिपी.

रावस माशाचे कालवण Salmon Fish Curry Recipe

पाककृती : रावस फिश करी

साहित्य – साफ केलेल्या रावस माशाचे तुकडी, ओल्या नारळाचा चव, आले, मिरची, लसून पाकळ्या, धणे, जिरे, मीठ, चिंचेचा कोळ, हळद, कोथिंबीर, तिरफळ एक कांदा (ऐच्छिक)

Salmon Fish Curry Recipe
Salmon Fish Curry Recipe

कृती – प्रथम माशाच्या तुकड्यांना मेरीनेशन साठी हळद, मीठ, लिम्बुचा रस, ग्रीन पेस्ट लावून १० मिनिट बाजूला ठेवा. त्यानंतर वाटणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी ओलं खोबर, मिरची, आले, ७-८ लसूण पाकळ्या, तिरफळ, जिरे, धने, कोथिंबीर, चिंच आणि मीठ एकत्र करून त्यात आवश्यक तेवढे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. त्यांनतर एका पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल घेऊन त्यात १ कांदा बारीक चिरून घालावा, २ मिनिटानंतर त्यावर सर्व ओले वाटप घालावे, ते ५ मिनिट्स शिजू द्यावे आणि मग सर्वात शेवटी फ्लेम कमी करून त्यामध्ये मेरीनेट केलेल्या माशाच्या तुकडी अलगदपणे सोडाव्या. मध्यम आचेवर शिजवून वरून सजावटीसाठी कोथिंबीर घालून सर्व करावे. मीठ वाटणामध्ये घातल्याने आवश्यकतेनुसार परत घालावे आणि वाफाळलेल्या भाताबरोबर आस्वाद घ्यावा.

रावस मासा फ्राय Salmon Fish Fry Recipe

पाककृती : रावस फिश फ्राय

साहित्य – रावस माशाचे तुकडे, ग्रीन पेस्ट, रवा, तांदूळ पीठ, लाल तिखट, कोकम आगळ, मीठ.

Salmon Fish fry Recipe
Salmon Fish fry Recipe

कृती – माशाच्या तुकड्यांना कट देऊन मेरीनेशनसाठी हळद, लाल तिखट, मीठ, कोकम आगळ, ग्रीन पेस्ट लावून १० मिनिट बाजूला ठेवून, तव्यामध्ये तेल तापायला ठेऊन, कोटींगसाठी रवा अथवा तांदूळपिठी वापरून एकदम चुरचुरीत फ्राय करणे. वरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये छान मऊ. फ्राय करताना मधी तेलामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा, त्यांची टेस्ट अप्रतिम येते. काही जण केळीच्या तर काही ठिकाणी हळदीच्या पानामध्ये सुद्धा मासे फ्राय करतात, हळदीच्या पानांची माशांमध्ये उतरलेली चव सुद्धा भन्नाट लागते.

रावस मासा खाण्याचे फायदे  Health Benefits of eating Salmon Fish

रावस माशाचा (Salmon Fish) शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी असतो त्यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे अनेक रोगांपासून शरीराचे संरक्षण होते, जितका चविष्ट तितकाच शरीरालासुद्धा उपयोगी असा हा मासा आहे रावस. या माशाचे नक्की कशाप्रकारे फायदे शरीराला होतात ते पाहूया थोडक्यात.

ओमेगा-३ फॅटी ऍसिड हे शरीराला आवश्यक असणारा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे आणि रावस माशामध्ये ओमेगा-३-फॅटी ऍसिडचे भरपूर प्रमाण आहे. प्रमाणामध्ये पहिले असता एका १०० ग्राम रावस माशामध्ये जवळपास ३ ग्राम पर्यंत ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते. त्वचा, मेंदू आणि  डोळे यांसाठी वरदान असल्यासारखेच आहे. त्याचा खूप लाभमिळतो आणि असे ओमेगा-३-फॅटी ऍसिड शरीराची सम्पूर्ण ताकद सुध्दा टिकऊन ठेवत. सांधेदुखी, हृदयचे विकार ज्यांना असतील त्यांनी शरीराला होणारा त्रास कमी करण्यासाठी ओमेगा-३-फॅटी ऍसिड असणार्या रावस माश्याचे सेवन नक्कीच करून पहावे.

Frozen Salmon Fish Pic
Frozen Rawas (Salmon) Fish Pic

त्याचप्रमाणे रावस माशामध्ये प्रोटीन (Salmon Fish Protein Proof) भरपूर प्रमाणात असते. शरीरातील अनेक कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते, जसे कि, एखादी जखम झाल्यावर ती भरण्यासाठी, शरीरातील स्नायू मजबूत राहण्यासाठी व तसेच हाडांची वाढ योग्य होण्यासाठी प्रोटिन्स उपयोगी पडतात. ही जीवनसत्त्वे आपल्या शरीरातील बर्‍याच महत्वाच्या प्रक्रियेत सामील असतात, जशे की आपण खाल्लेले अन्नचं रुपांतर उर्जेमध्ये करणे, तसेच डीएनए तयार करणे आणि चयापचय सिस्टीम दुरुस्त करणे अशी अनेक प्रक्रियेसाठी व्हिटामिन बी आवश्यक असते.

Health benefits of consuming Salmon Fish in marathi
Health benefits of consuming Salmon Fish

रावस मासा ओमेगा-३-फॅटी ऍसिड ने भरपूर असल्याने हा मासा खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढत नाही, त्याची पातळी सामान्यच राहते. वाढलेल्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याचे काम ओमेगा-३-फॅटी ऍसिड करते. रावस मासा (Salmon Fish Medical Benefit in Marathi) हा भरपूर प्रोटीनयुक्त असल्याने त्यामध्ये चरबीचे प्रमाण खूप कमी असते. रावस माशाची चरबी ही पूर्णपणे माशामध्ये सामावलेली असते त्यामुळे रावस मासा खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्वे मिळतात तसेच चरबी कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

रावस मासा चांगला की वाईट ? Final Verdict about Salmon Fish in Marathi

रावस मासा हा खाऱ्या पाण्यात वाढणारा मासा असला तरी देखील हल्ली रावस माश्याची मत्स्यशेती देखील सुरू झाली आहे. रावस माश्याच्या नियमित आहाराने शरीरातील प्रोटीन ची मात्रा चांगल्या प्रकारे पूर्ण होऊन आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. नियमित रावस मासा आहारात घेतल्यास हृदयरोग किव्हा स्ट्रोक येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहारतज्ञ आठवड्यातुन कमीत कमी दोनदा तरी मासे खाण्याचा सल्ला देतात, आणि खासकरून रावस मासा Salmon Fish ता ते प्राधान्याने ग्रहण करायला सांगतात. तुम्हाला आजचा लेख Salmon Fish in Marathi कसा वाटला ते नक्की कळवा आणि वाचकांनी आपल्या शरीरप्रवृत्ती ला अनुसरून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रावस मासा अर्थात Salmon Fish आहारात घेण्याचा निर्णय घ्यावा.