Monday, March 1, 2021
Home Sports News Cricket नावाप्रमाणेच अजिंक्य

नावाप्रमाणेच अजिंक्य

अजिंक्य रहाणे याचा जन्म ६ जून १९८८ रोजी आश्वी खुर्द, जिल्हा अहमदनगर येथे झाला. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे रहाणेचं मूळ गाव. त्याचं लहानपण मुंबईचं उपनगर असलेल्या डोंबिवलीत गेलं. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी या खेड्यात राहणारे मराठा श्री मधुकर बाबुराव रहाणे व सुजाता रहाणे हे त्याचे आई वडील. त्याला शशांक हा एक लहान भाऊ आणि अपूर्वा ही एक लहान बहीण आहे. जेव्हा रहाणे ७ वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला डोंबिवली येथे मॅट विकेट वरील प्रशिक्षणासाठी घेऊन गेले होते. परंतू, तेथे त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. माजी भारतीय कसोटी पटू प्रवीण आमरे यांचेकडे त्याने वयाच्या १७ वर्षापर्यंत प्रशिक्षण घेतले.  त्याचे वडील मधुकर राहाणे यांनी त्याला डोंबिवलीच्या एका क्रिकेट कोचिंग कँपमध्ये नेलं आणि तिथून खरंतर त्याच्या क्रिकेटमय स्वप्नांचा प्रवास सुरू झाला. त्याच्या वडिलांनी एकदा एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. “मी तर त्याला त्या कँपमध्ये घेऊन गेलो, कारण मला वाटायचं,  त्याने शाळे नंतरचा त्याचा वेळ वायफळ घालवू नये. तिथल्या कोचने त्याला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो दाखवत विचारलं, याला ओळखतोस? “तेव्हा तो म्हणाला, हो. सचिन तेंडुलकर. कोचने मग विचारलं, मग एक दिवस याच्यासोबत खेळायचंय? अज्जू हो म्हणाला. आणि मला जरा अवघडल्यासारखं वाटलं. कारण एवढं मोठं स्वप्न त्याने अचानक असं बोलून दाखवलं होतं.”

ajinkya rahane with her daughter

चांगल्या दर्जाच्या बॉलिंगचा सामना करण्याची ताकद, ताकदीने खेळी करण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन, चपळ फिल्डर, उत्तम तंत्रकौशल्य आणि दमदार फिटनेस या गुणकौशल्यांच्या बळावर अजिंक्यने मुंबई क्रिकेट गाजवलं. विविध वयोगट स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर तो मुंबईसाठी खेळू लागला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे अजिंक्यची टीम इंडियासाठी निवड व्हायची मात्र बराच काळ त्याला राखीव खेळाडू म्हणून वावरावं लागलं. त्याची १५ जणांच्या टीममध्ये हजेरी लागायची, मात्र अंतिम ११ मध्ये त्याचा नंबरच लागत नव्हता. त्यासाठी त्याला तब्बल १६ महिने वाट पाहावी लागत होती. राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना अजिंक्यला टीम इंडियाचा माजी खेळाडू राहुल द्रविडचं मार्गदर्शन लाभलं. शांत, संयमी स्वभाव, खेळपट्टीवर ठाण मांडून मोठी खेळी करण्याची ताकद, ना टॅटू, ना कुठले फंकी अॅड, वाचाळपणा नाही, आक्षेपार्ह वर्तन नाही. यामुळे रहाणेच्या खेळात, वागण्या बोलण्यात द्रविडचा प्रभाव दिसतो असं अनेकजणांचे मत बनले.

विदेशात दर्जेदार बॉलिंगसमोर, आव्हानात्मक खेळपट्यांवर खेळणं अवघड असतं. घरच्या मैदानावर शेर असणारे अनेक बॅट्समन विदेशात अनेक अडचणींचा सामना करताना दिसतात. अजिंक्यचं वेगळेपण यामध्ये आहे. २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत दरबानला अजिंक्यने साकारलेल्या ९६ धावांच्या खेळीचे आजही क्रिकेटप्रेमी आठवतात. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अजिंक्य अकराव्या स्थानी आहे.

ajinkya rahane wins border gavaskar trophy

अॅडलेड टेस्टमध्ये मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियावर जोरदार टीकेची झोड उठली होती. त्यातच या टेस्टनंतर विराट कोहली पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतला. परंतु अजिंक्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ऐतिहासिक आणि दणकेबाज विजय मिळविला. अजिंक्यने शतकी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या दमदार विजयासह भारतीय संघाने अॅडलेड पराभवाची परतफेड तर केलीच, शिवाय बॉर्डर-गावस्कर मालिकेत १-१ बरोबरी केली. अजिंक्यला शतकी खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. ऐतिहासिक आणि दमदार विजयाच्या निमित्ताने अजिंक्यवर सर्व माध्यमातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments