Monday, March 1, 2021
Home Sports News Athletics अंजू बॉबी जॉर्जनी केला मोठा खुलासा

अंजू बॉबी जॉर्जनी केला मोठा खुलासा

अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म केरळच्या कोट्टायम तालुक्यातील चीरनिरारा गावातील कोचुपरम्बी कुटुंबात झाला. इतक्या वर्षांनी पुन्हा कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या वडिलांनी तिला ॲथलेटिक्समध्ये आणले. तिने सीकेएम कोरथोड स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले व विमला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. कोरुथोड स्कूलमधील तिच्या क्रीडाशिक्षकाने तिची ॲथलेटिक्सची आवड विकसित केली. १९९१-१९९२ च्या शालेय ॲथलेटिक मैदानामध्ये तिने १०० मीटर अडथळ्याची शर्यत आणि रिले शर्यत जिंकली. त्यावेळी तिने आणि लांब उडी आणि उंच उडीच्या स्पर्धांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. शाळांच्या राष्ट्रीय गेम्समध्ये अंजूची प्रतिभा दिसून आली होती.

प्रतिकूल शारीरिक परिस्थितीवर मात करीत आपण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये पदक मिळविल्याचे नमूद करीत, अंजूने प्रथमच आपल्या शारीरिक व्याधींचा उल्लेख केला आहे. केवळ एक मूत्रपिंड, वेदनाशामक गोळ्यांचा होणारा त्रास आणि उडी मारण्यासाठी ज्या पायावर भार येतो त्याला असलेली दुखापत,  अशा अनेक मर्यादांवर मात करून आपण शिखरावर पोहोचलो, असे सांगून भारताच्या या माजी लांब उडीपटूने आपल्या जिद्दीची कथाच जगासमोर मांडली. सध्याच्या या कोरोन काळामध्ये येणारे मानसिक आणि शारिरीक नैराश्यावर मात करणे किती आवश्यक आहे या बद्दल तिने भाष्य केले आहे. “ शरीराला अनेक मर्यादा असल्या,  तरी तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर लक्ष्य साध्य करणाऱ्यांसाठी माझी ही छोटीशी गोष्ट प्रेरणादायी ठरू शकते,” हे तिचे वाक्य तंतोतंत खरे आहे. एक मूत्रपिंड असलेल्यांना डॉक्टर शारीरिक श्रम न करण्याचा सल्ला देतात. खेळाडूंना तर सतत मेहनत, सराव करावा लागतो; म्हणूनच अंजूची कामगिरी वेगळी ठरते. मुख्य म्हणजे एकच मूत्रपिंड असल्याचे तिलाही खूप वर्षांनी कळले, तरीही निराश न होता, खचून न जाता, ती नव्या जोमाने स्पर्धेत उतरली. यात तिचे पती आणि प्रशिक्षक रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांचा मोठा वाटा आहे.

अंजूने सप्टेंबर २००३ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ६.७० मीटर लांब उडी मारून ब्रॉन्झपदक जिंकले व भारताला प्रथमच विश्वस्तरीय स्पर्धेतील पुरस्कार मिळवून दिला. ह्याच उपक्रमात ती भारतीय ॲथलीट बनली. २००५ मध्ये आयएएएफ जागतिक ॲथलेटिक्स फायनलमध्ये तिने रजत पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम लॉंग जंप होती. २००४ मध्ये अंजू बॉबी जॉर्ज हिला ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कार दिला गेला. २००२ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments