Thursday, February 25, 2021
Home Sports News पी. व्हि. सिंधुच्या मागण्या मान्य

पी. व्हि. सिंधुच्या मागण्या मान्य

विश्व चॅम्पियन २६ वर्षीय सिंधू टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम  कोअर समूहाचा भाग आहे. ती कोविड -१९ मुळे खेळात आलेल्या अडथळ्यानंतर जानेवारीमध्ये स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करणार आहे. पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले की, ही कोरोना महामारी माझ्यासाठी डोळे उघडणारी ठरली. मी विरोधकांशी लढण्यासाठी खूप मेहनत करू शकते. अखेरच्या शॉटपर्यंत ताकद लावू शकते. मी याआधीही हे केलं आहे आणि मी पुन्हा ते करू शकते. मात्र या न दिसणाऱ्या व्हायरसला ज्याने जगात आपले पाय घट्ट रोवले आहेत त्याला मी कशी हरवू ! घरात बसून बरेच महिने झाले आहेत आणि बाहेर पडण्यासाठी आपण स्वत:लाच सवाल करत आहोत. आपल्याला या सगळ्या गोष्टी समजत आहे. ऑनलाईन अशा कितीतरी गोष्टी वाचल्या आहेत ज्यामुळे जीव तुटला आहे. आता स्वत:लाच सवाल करत आहे की आपण कुठे जगत आहोत.

स्पोर्ट्स ऑथोरीटी ऑफ इंडिया (साई) ने स्पष्ट केले की, सरकाने तीन स्पर्धांसाठी फिजिओ व फिटनेस ट्रेनर देण्याची तिची मागणी मान्य केली आहे. या तीन स्पर्धा योनेक्स थायलंड ओपन (जानेवारी १२-१७), टोयोटा थायलंड ओपन (१९-२४ जानेवारी) आणि बँकॉकमध्ये २७ ते ३१ जानेवारीपर्यंत खेळल्या जाणाऱ्या विश्व टूर फायनल्स आहेत. साईने पुढे म्हटले की, या कालावधीत फिजिओ व ट्रेनरचा खर्च जवळजवळ ८.२५ लाख रुपये असेल आणि त्याला मंजुरी देण्यात आली आहे. हैदराबादची खेळाडू सध्या लंडनमध्ये ‘गॅटोरेड स्पोर्ट्स सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट रेबेका रँडेला यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेसवर मेहनत घेत आहे. त्याचसोबत सिंधू बॅडमिंटन इंग्लंडचे टॉबी पेंटी व राजीव ऑपेश यांच्यासोबत नॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव करीत आहे. तिने ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. बीडब्ल्यूएफ लॉजिस्टिक मुद्यांच्या आधारावर २०२० विश्व टूरसाठी नवा कार्यक्रम तयार केला आहे. त्यात आशियाई गटातील दोन मोठ्या स्पर्धांव्यतिरिक्त विश्व टूर फायनल्स स्पर्धा जानेवारीमध्ये खेळली जाणार आहे. त्याचसोबत सिंधू बॅडमिंटन इंग्लंडचे टॉबी पेंटी व राजीव ऑपेश यांच्यासोबत नॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव करीत आहे. तिने ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. बीडब्ल्यूएफ (विश्व बॅडमिंटन महासंघ) लॉजिस्टिक मुद्यांच्या आधारावर २०२० विश्व टूरसाठी नवा कार्यक्रम तयार केला आहे. त्यात आशियाई गटातील दोन मोठ्या स्पर्धांव्यतिरिक्त विश्व टूर फायनल्स स्पर्धा जानेवारीमध्ये खेळली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments