३६ वर्षांच्या भारतीय वेगवान गोंलंदाज अशोक डिंडाने २ फेब्रुवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या फास्ट बॉलरनं भारताकडून १३ वन-डे आणि ९ T-20 मॅच खेळल्या आहेत. डिंडाने २००९ साली महेंद्रसिंह धोनी कॅप्टन असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. डिंडाने वन-डे मध्ये १७ तर T-20 मॅचमध्ये १७ विकेट्स घेतल्या. त्याला २०१३ साली टीम इंडियामधून वगळण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र, तो शेवटचे ७ वर्षांपूर्वी खेळला आहे. जानेवारी २०१३ साली इंग्लंडविरुद्ध खेळलेला वनडे सामना त्याचा कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर त्याची कधीही भारतीय टीममध्ये निवड झाली नाही.
देशांतर्गत क्रिकेटमधील एक दिग्गज गोलंदाज म्हणून डिंडाला ओळखले जाते. कारकरिर्दीतील अनेक वर्षे बंगालसाठी खेळलेल्या डिंडाने यावर्षी गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. नुकतीच पार पडलेली सईद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी त्याची शेवटची स्पर्धा ठरली. डिंडाने त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत एक खास विक्रमही केला आहे. साल २०१०-११ च्या हंगामापासून २०१८-१९ सालच्या हंगामापर्यंत ९ वेळा रणजी ट्रॉफीचे आयोजन झाले. त्यातील ८ वेळा बंगालकडून सर्वाधिक विकेट्स डिंडाने घेतले. या ९ वर्षांच्या कालावधीत केवळ २०१२-१३ चा हंगाम असा होता, ज्यात डिंडाला बंगालकडून सर्वाधिक विकेट्स घेता आल्या नाहीत. त्या हंगामात मोहम्मद शमीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. डिंडाने भारताकडून १३ वनडे सामने आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने अनुक्रमे १२ आणि १७ विकेट्स घेतले आहेत. त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जास्त बहरली नसली तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने भरीव कामगिरी केली आहे. तो गेल्या ९ हंगामातील ८ हंगामात बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. याबाबत रोहन गावसकर यांनीही ट्विट करत माहिती दिली आहे.
डिंडाने त्याच्या कारकिर्दीत ११६ प्रथम श्रेणी सामन्यात २८.२८ च्या सरासरीने ४२० बळी घेतले आहेत. १२३ धावांत ८ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने २६ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. तर ५ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी त्याच्या नावे आहे. त्यातील ९० प्रथम श्रेणी सामने त्याने बंगालसाठी खेळले असून यात त्याने २७.५३ च्या सरासरीने ३३९ विकेट्स घेतल्या आहेत. तो बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.