Sunday, February 28, 2021
Home Sports News Cricket क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी, ३ बॉक्सिंग डे कसोटीचा मिळणार लाभ

क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी, ३ बॉक्सिंग डे कसोटीचा मिळणार लाभ

दरवर्षी २६ डिसेंबरला होणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी असे म्हटले जाते. २६ डिसेंबर दिवशी ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका देशातही बऱ्याचदा कसोटी सामने होत असतात. यंदा देखील या तिन्ही देशात बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. क्रिकेट जगतामध्ये २६ डिसेंबरला २०२० ला एक वेगळेच महत्व दिले जाते. २६ डिसेंबर दिवशी जवळपास गेले ४० वर्षे नियमितपणे कसोटी सामने होत असतात. त्यातही ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना प्रसिद्ध आहे. साधारणपणे क्रिकेट विश्वात ख्रिसमसनंतर २६ डिसेंबरला खेळण्यात येणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे क्रिकेट असं म्हटले जाते. या बॉक्सिंग शब्दामुळे हा सामना बॉक्सिंगशी संबंधित आहे की काय, असंही अनेकांना वाटतं. पण तसं नाहीये. या बॉक्सिंगचा संबंध ख्रिसमस बॉक्सशी आहे. जगातील अनेक देशांमध्ये ख्रिसमसनंतरच्या दुसऱ्या दिवसाला म्हणजेच २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक जण नातेवाईक आणि मित्रांना बॉक्स भेट देतात. ही परंपरा गेल्या काही दशकांपासून सुरु आहे. त्यामुळे २६ डिसेंबरला होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे क्रिकेट असं म्हटले जाते.

२६ डिसेंबर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिलाच सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल. हा सामना माउंट मोंगनूईच्या बे ओव्हल स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतीय वेळेप्रमाणे पहाटे ३.३० वाजता सुरु होईल.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या दोन संघात होईल. हा सामना या दोन उभय संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरुवात होईल.

यावेळी तिसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळवला जाईल. या सामन्याने या दोन देशांतील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंच्यूरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. 

बॉक्सिंग डे आणि क्रिकेटचा संबंध हा तब्बल १२८ वर्षांपासूनचा आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १८९२ मध्ये शेफील्ड शील्डचा एक सामना खेळण्यात आला. त्यामुळे व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्समध्ये ख्रिसमस दरम्यान क्रिकेट सामने खेळण्याचा पायंडा पडला होता, दरम्यान मेलबर्नमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९५० मध्ये खेळण्यात आला होता. हा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात आला होता. हा सामना २२ डिसेंबरला खेळण्यात आला होता. मेलबर्नमध्ये १९८० आधी १९५२, १९६८, १९७४ आणि १९७५ असे एकूण ४ कसोटी सामने खेळले गेले होते. या व्यतिरिक्त १९६७, १९७२ आणि १९७६ मध्ये अ‌ॅडिलेड येथे बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळण्यात आली. या सामन्यानंतर ५ वर्षांनी ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे मॅच खेळवण्यास सुरुवात केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments