क्लेयर पोलोसाक यांची १४४ वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अंपायरची पुरुषांच्या टेस्ट मॅचसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना नियमावलीमुळे आयसीसीने तटस्थ पंचांच्या व्यवस्था शिथिल करत ज्या देशात मॅच असेल त्याच देशातल्या अंपायर्सची नियुक्ती करण्यात येते आहे. सिडनी टेस्टसाठी क्लेयर या फोर्थ अंपायर आहेत. ३२ वर्षीय क्लेयर यांच्याकडे फोर्थ अंपायर म्हणून पिच सुस्थितीत ठेवणे, मॅचसाठी आवश्यक उपकरणं पुरवणे, ऑन फिल्ड अंपायर्सना साहाय्य करणे या जबाबदाऱ्या आहेत. ऑन फिल्ड अंपायर्सपैकी कोणी दुखापतग्रस्त किंवा आजारी पडल्यास क्लेयर या थर्ड अंपायरच्या भूमिकेत दिसू शकतात. जर कोणत्याही कारणामुळे फिल्ड अम्पायर मैदानात उपस्थित नसतील तर त्यावेळी तिसऱ्या अम्पायरला मैदानावर अम्पायरिंगसाठी जावं लागतं. अशातच चौथा अम्पायर, तिसऱ्या अम्पायरची भूमिका साकारताना दिसून येतो.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी इथं सुरू झालेल्या तिसऱ्या टेस्ट दरम्यान क्लेयर पोलोसाक या पुरुषांच्या क्रिकेटमध्ये, टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला अंपायर ठरल्या. याआधी क्लेयर पोलोसाक यांनी २०१९ मध्ये नामीबिया आणि ओमानमध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन टूच्या सामन्यात अम्पायरिंग करण्याची संधी मिळाली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणाऱ्या सिडनी कसोटी सामन्यात पॉल रिफेल आणि पॉल विल्सन ग्राउंड अम्पायरची भूमिका निभावणार आहेत.
Congratulations to Claire Polosak who makes history today by becoming the first woman to officiate in a men's Test 🙌#AUSvIND pic.twitter.com/p1APX3zpeL
— ICC (@ICC) January 7, 2021
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वर्ल्ड क्रिकेट लीगमधील नामिबिया आणि ओमान यांच्यातील पुरुषांच्या मॅचदरम्यान त्यांनी अंपायरिंग केलं होतं. डिसेंबर २०१८ मध्ये क्लेयर आणि एलोइस शेरिडान यांनी ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश ट्वेन्टी-२० स्पर्धेत अॅडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील मॅचदरम्यान अंपायरिंग केलं होतं. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेटमधल्या न्यू साऊथ वेल्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यातल्या वनडे मॅच दरम्यान क्लेयर यांनी अंपायरिंग केलं होतं. २०१६ मध्ये भारतात झालेल्या महिला ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये क्लेयर आणि न्यूझीलंडच्या कॅथी क्रॉस यांनी अंपायरिंग केलं होतं. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या क्लेयर गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या महिला ट्वेन्टी-२० वर्ल्डकप साठीच्या अंपायरिंग पॅनेलमध्ये होत्या. क्लेयर आयसीसीच्या डेव्हलपमेंट अंपायर पॅनेलचा भाग आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा आज तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या गुणतालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीच्या गुणांवर आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये २-२ असा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माची संघात वापसी झाली आहे. तर या व्यतिरिक्त नवदीप सैनी आपला डेब्यू सामना खेळणार आहे.