Saturday, March 6, 2021
Home Sports News Cricket तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला रेकॉर्ड बनविण्याची संधी

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला रेकॉर्ड बनविण्याची संधी

सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय फलंदाजांनी काही अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. मात्र टीम इंडियासाठी हे मैदान विशेष काही लकी नाही. येथे सहा सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या मैदानावर भारताने एकमेव सामना जिंकला आहे, तोही ४२ वर्षांपूर्वी. जर अजिंक्य रहाणेच्या संघाने सिडनीमध्ये इतिहास रचला आणि त्याला २-१ अशी आघाडी मिळाली तर बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडेच राहील. भारतीय संघाकडून मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव हे आघाडीचे गोलंदाज दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. या गोलंदाजांच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराजप्रमाणे नवदीप सैनी याच्याकडून चांगल्या पदार्पणाची अपेक्षा आहे. अश्विनने स्मिथला दोनदा बाद करण्या व्यतिरिक्त या मालिकेत १० बळी घेतले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अश्विनच्या गोलंदाजीवर खेळताना अनेक अडचणी येत आहेत.

या सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने २७ षटके गोलंदाजी केली. डिसेंबर २०१० नंतर ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा भारताच्या सलामीच्या जोडीने आशिया खंडाच्या बाहेर २० किंवा त्यापेक्षा अधिक षटके फलंदाजी केली. याआधी विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी दक्षिण आफ्रिके विरुद्ध सेंच्युरियन मैदानावर २९.३ षटके फलंदाजी केली होती. त्यानंतर भारताने कसोटीत आशिया खंडाबाहेर ९२ डाव खेळले पण एकाही सलामीच्या जोडीला २० ओव्हर फलंदाजी करता आली नाही. या जोडीने १९व्या षटकात ५० धावांची भागिदारी पूर्ण केली. गेल्या १४ डावात भारताच्या सलामीच्या जोडीने प्रथमच ५० हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा सलामीवीर शुभमन गिलने करिअर मधील पहिले अर्धशतक झळकावले. शुभमनला मेलबर्न कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली होती. तेव्हा त्याने मोठी धावसंख्या केली नसली तरी स्वत:ची क्षमता दाखवून दिली होती. आता सिडनीत त्याने अर्धशतक करून एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.

मेलबर्न कसोटीच्या विजयासह टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. विशेषतः स्पीनर्ससाठी उपयुक्त ठरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या खेळपट्टीवर तिसर्‍या कसोटीत विजय मिळवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघही मेलबर्नच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया संघाला दिलासा मिळाला आहे. डेव्हिड वॉर्नरने स्पष्ट केलंय की तो भारतीय गोलंदाजां विरूद्ध आक्रमक वृत्ती बाळगणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments