Sunday, February 28, 2021
Home Sports News Cricket बूम बूम खेळणार मायदेशात पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेट

बूम बूम खेळणार मायदेशात पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेट

भारतामध्ये पहिल्यांदाच टेस्ट खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहची अनोखी संधी सुरुवातीला हुकली. जवळपास वर्षभरानंतर टीम इंडिया मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरली आहे. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर टीम इंडिया मायदेशात विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. कर्णधार विराट कोहली टीम इंडियात पुनरागमन करत आहे, त्यात इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व आर अश्विन हेही सज्ज झाले आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना जसप्रीत बुमराह याच्यासाठी खास आहे. बुमराहच्या पहिल्याच बॉलवर रॉरी बर्न्सचा कॅच ऋषभ पंतनं सोडला. बुमराह आणि इंशात शर्मा या अनुभवी जोडीविरुद्ध इंग्लंडच्या सलामीविरांनी सावध खेळ केला. त्यामुळे विराट कोहलीनं अनुभवी ऑफ स्पिनर आर.अश्विनच्या हाती बॉल सोपवला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टमधील पहिल्या सत्रात टीम इंडियानं कमबॅक केलं आहे. रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ली या जोडीनं सुरुवातीला सावध खेळ केला. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ६३  रनची पार्टरनरशिप केली. मात्र त्यानंतर टीम इंडियानं कमबॅक केल्यानं लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोअर २ आऊट ६७ असा झाला आहे. भारतीय पिचवरील मोठा मॅच विनर असलेल्या आर.अश्विनने मैदानात जम बसलेल्या रॉरी बर्न्सला आऊट केलं. अश्विनच्या बॉलिंगवर बर्न्सचा कॅच दुसऱ्यांदा सोडण्याची चूक पंतने केली नाही.

५ जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं कसोटी संघात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. वेस्ट इंडिज व न्यूझीलंड असे दौरे गाजवले. त्यानं १७ कसोटी सामन्यांत ७९ विकेट्स घेतल्या आणि ६ बाद २७ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. आज मायदेशात बुमराह प्रथमच कसोटी सामना खेळत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर त्याला मायदेशात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. यापूर्वी जवागल श्रीनाथनं १२ कसोटीनंतर मायदेशात पहिला सामना खेळला होता. आर पी सिंग (११) व सचिन तेंडुलकर (१०) यांनाही ही प्रतीक्षा करावी लागली. घरच्या मैदानावर पहिला सामना खेळण्यासाठी १७ किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची प्रतीक्षा पाहावी लागलेला बुमराह हा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या डॅरेन गंगा याने १९९८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटी पदार्पण केलं आणि त्यानंतर एप्रिल २००३ मध्ये घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments