Monday, March 1, 2021
Home Sports News Cricket भारताचा अजून एक खेळाडू दुखापतग्रस्त

भारताचा अजून एक खेळाडू दुखापतग्रस्त

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट ७ जानेवारी पासून सिडनीमध्ये सुरु होणार आहे. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका जिंकली तर भारतीय संघाने ट्वेन्टी-20 मालिकेवर कब्जा केला. बॉर्डर-गावस्कर मालिकेत अडलेड कसोटीत भारतीय संघाचा ३६ धावांमध्येच ऑलआऊट झाल्याने नामुष्की ओढवली होती. या पराभवातून बोध घेत भारतीय संघाने मेलबर्न कसोटी जिंकत जबरदस्त पुनरागमन केलं. चार सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी झाली असून, दोन सामने बाकी आहेत. तिसरी टेस्ट ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरू होत आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील सिडनी आणि ब्रिस्बेन टेस्टसाठी राहुल उपलब्ध असणार नाही. राहुल मायदेशी परतणार असून, बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत असेल. दीड महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएल स्पर्धेत राहुलने सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनला देण्यात येणारा ऑरेंज कॅपचा पुरस्कार पटकावला होता. सहा वर्षांपूर्वी राहुलने ऑस्ट्रेलियातच टेस्ट पदार्पण केलं होतं. २०१५ मध्ये सिडनी येथे राहुलने टेस्ट मधील पहिली शतकी खेळी साकारली होती.

शनिवारी मेलबर्नमध्ये बॅटिंगचा सराव करताना राहुलचं डावं मनगट दुखावलं गेलं होतं. त्यामुळे तो आता उर्वरित दोन टेस्ट खेळू शकणार नाही, असं BCCI नं स्पष्ट केलं आहे. त्याला संपूर्णपणे फिट होण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. राहुलच्या जागेवर टीममध्ये कोणत्याही खेळाडूची वर्णी लागेल याचा निर्णय अजून झालेला नाही. राहुल आता लवकरच भारतामध्ये परतणार असून बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमी मध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत. टीम इंडियाचा अनुभवी बॉलर इशांत शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने तो बॉर्डर-गावस्कर मालिकेत खेळू शकला नाही. स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध भुवनेश्वर कुमार आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तोही या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. अडलेड कसोटीत पॅट कमिन्सचा उसळता चेंडू हातावर आदळल्यामुळे फास्ट बॉलर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. मेलबर्न टेस्टदरम्यान मांडीचे स्नायू दुखावल्याने दुसऱ्या इनिंग्जमध्ये फास्ट बॉलर उमेश यादवने माघार घेतली. उमेशच्या दुखापतीसाठी एक्सरे काढण्यात आले. दरम्यान आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झालेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा क्वारंटीन पूर्ण करून संघात दाखल झाला आहे. रोहितची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे आणि तो उर्वरित दोन कसोटीत खेळेल.

राहुल या टेस्ट मालिकेत एकही मॅच अजून खेळलेला नव्हता. सलामीवीर तसेच विकेटकीपर म्हणून राहुल बॅकअप खेळाडू होता. रोहित शर्मासह पाच भारतीय संघाच्या खेळाडूंच्या प्रोटोकॉल उल्लंघनाच्या वादानंतर केएल राहुल संघातून बाहेर गेल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आता भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या मालिकेसाठी निवड होण्यापूर्वी त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments