Saturday, March 6, 2021
Home Sports News Cricket नवोदित खेळाडूना महिंद्राकडून स्पेशल गिफ्ट

नवोदित खेळाडूना महिंद्राकडून स्पेशल गिफ्ट

भारतीय संघाच्या खेळाडूंना या ऐतिहासिक विजयानंतर जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा यांनी या खेळाडूंना एसयूव्ही भेट म्हणून देत नव्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या सहा खेळाडूंना आनंद महिंद्रांकडून भेट मिळणार आहे. भारतानं ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. काही सीनिअर खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला धुळ चारली. यानंतर भारतीय संघ भारतात परतल्यानंतर संघातील सर्वच खेळाडूंचं जंगी स्वागतही करण्यात आलं. गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत पराभव बघितलेला नव्हता. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकले, अशा प्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडने हलवून सोडले आणि कांगारूंना पराभूत केले. अनुभवी आणि दिग्गज खेळाडू जखमी असताना नवख्या खेळाडूंनी दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण केले.

भारताने ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. गाबा मैदानावर आतापर्यंत २५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आले नव्हते. १९५१ मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे २३६ धावांचे लक्ष्य गाठले होते. मात्र, भारतीय संघाने ऐतिहासिक विजयासह वेस्ट इंडिजचा ७० वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते हे देखील जखमी भारतीय टीमने चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने पटकावली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अ‍ॅडिलेड येथील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, नंतर त्यांनी हर मानली नाही आणि कांगारू संघाला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही.

mahindra thar car

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात अभूतपूर्व यश मिळवून देण्यात शुभमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन  यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या परिश्रम, कष्टाचे कौतुक करत महिंद्र यांनी ट्विटरवर ही घोषणा केली. महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे देखील भारतीय संघाच्या या विजयावर अतिशय खुष आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत पदार्पण करणाऱ्या सहा खेळाडूंना महिंद्राची नवी SUV थार गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत ही माहिती दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments