Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket मोहम्मद अझरूद्दीनची रंजकदार खेळी

मोहम्मद अझरूद्दीनची रंजकदार खेळी

नाव वाचल्यावर सगळी नक्कीच आश्चर्यचकित झाली असतीलच. सय्यद मुश्ताक अली चषकातील केरळचा युवा फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन याच्या नावाबद्दल एक गमतीची पण तरीही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन आणि केरळचा युवा फलंदाज अझरूद्दीन यांचे एक वेगळेच कनेक्शन आहे. या युवा अझरचा जन्म १९९४ साली झाला. तेव्हा माजी कर्णधार अझरूद्दीनची लोकप्रियता शिखरावर होती. कमरूद्दीनचे आई-वडील छोट्या मुलाचे नाव दुसरे काही तरी ठेवणार होते. त्याचा चाहता असलेला युवा अझरचा भाऊ कमरुद्दीने आवडता क्रिकेटपटू अझरुद्दीनचे नाव आपल्या छोट्या भावाचे ठेवले जेव्हा अझरुद्दीन असे नाव ठेवण्यात आले तेव्हा कोणालाच वाटले नव्हते की मोठा झाल्यावर तो क्रिकेटपटू होउन एवढा नावलौकिक मिळवून ऐतिहासिक जबरदस्त खेळी करेल. युवा फलंदाज अझरूद्दीनने २०१५ साली प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरूवात केली होती. त्याने २२ सामन्यात ९५९ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

या अझहरुद्दीनची आज जोरदार चर्चा रंगली आहे ती त्याने केलेल्या तुफानी खेळीमुळे. केरळचा युवा फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनने सलामीला येत वादळी फलंदाजी केली. त्याने मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. अझरने फक्त ३७ चेंडूत शतक झळकावले आणि केरळला १५.५ षटकात ८ विकेट राखून विजय मिळून दिला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्याशी नाव समानता असलेला केरळचा हा फलंदाज सकाळपासून ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होता. केवळ नावच नाही तर कामही अझहरसारखं आहे. जाणून घेऊया मुंबईविरुद्ध तुफानी खेळी रचणाऱ्या केरळच्या या मोहम्मद अझहरुद्दीनविषयी थोडक्यात.

आता युवा अझहरुद्दीनची क्रिकेट कारकीर्द पाहू. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात २०१५ मध्ये केली होती. अझहर नावाने प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूने आतापर्यंत २२ प्रथम श्रेणी सामन्यात ९५९ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबईविरुद्ध केलेलं शतक हे त्याच्या कारकीर्दीतल पहिलं शतक आहे. याआधी त्याच्या नावावर एक अर्धशतकही नव्हतं. मोहम्मद अझहरुद्दीनने आठ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं. तो केवळ चारच चेंडू न धावता खेळला. ५४ चेंडूत नऊ चौकार आणि षटकारांच्या मदतीने त्याने नाबाद १३७ धावा केल्या. त्याने २१ सामन्यांमध्ये ४०४ धावा केल्या आहेत. मोहम्मद अझहरुद्दीनच शतक हे सय्यद मुश्ताक अली चषकातील दुसरं सर्वात वेगवाग शतक आहे. याआधी रिषभ पंतने २०१८  मध्ये ३२  चेंडूत शतक केलं होतं. तर केरळसाठी टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज आहे. याआधी केरळकडून २०१३  मध्ये रोहन प्रेमच्या नाबाद ९२  धावा ही सर्वोच्च होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments