चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत ०-१ अशी आघाडी घेतली असून मालिकेतील दुसरा कसोटी सामना शनिवार, १३ फेब्रुवारी चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नुकतंच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यामधून जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चरसह ४ प्रमुख खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. यांच्या जागी इंग्लंड इलेव्हनमध्ये बेन फोक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली स्टोन आणि क्रिस वोक्स यांचा समावेश झाला आहे. तीन खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर आर्चर दुखापतीमुळे इलेव्हनमुळे बाहेर पडला आहे. वोक्स आणि स्टोन यांच्यातील एक दुसर्या कसोटी सामन्यात ११ प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होईल.
इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चांगलीच नेट प्रक्टीसवर भर दिला आहे. विराटने नुकतंच आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले ज्यात टीम इंडिया कर्णधार नेटमध्ये मेहनत घेताना दिसत आहे. विराटने बॅटिंग आणि फिल्डिंग सराव करतानाचे आपले फोटो शेअर केले. चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात २२७ धावांनी यजमान भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. अशा स्थितीत, पाहुण्या इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशी आघाडी घेतली आणि आता संघ सिरीजमध्ये विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय संघ पूर्ण ताकदीने इंग्लिश टीमला टक्कर देण्याच्या तयारीला लागले आहेत. १३ फेब्रुवारीपासून मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल.
काम चालू आहे, असं लिहीत विराटने सोशल मीडियावर फोटो शेअर केला. चेन्नईत इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात कोहलीने आपला पर्फोर्मंस दाखवला आणि ७२ धावा केल्या. पण त्याच्या प्रयत्ना नंतरही भारत पहिला सामना जिंकण्यात अपयशी ठरला. भारताचा कर्णधार दुसर्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल, आणि पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने खेळलेला डाव पाहून कोहली आपल्या शतकांचा दुष्काळ संपवेल असा अनेकांना विश्वास आहे. चेन्नईत पहिला सामना प्रेक्षकांवीना खेळविला गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी मिळाली आहे. दुसऱ्या चेन्नई टेस्टसाठी स्टेडियममध्ये ५० टक्क्यांपर्यंत प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.