Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket माजी कर्णधार सौरव गांगुली इस्पितळात भरती

माजी कर्णधार सौरव गांगुली इस्पितळात भरती

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सौरव गांगुली व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळपासून छातीत दुखत असल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला असून रुग्णालयात त्याचं ईसीजी, ईसीओ आणि कार्डिओ करण्यात आलं आहे. आज सकाळीच गांगुलीना छातीत दुखत असल्यामुळे आणि चक्कर येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुलीवर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीवर आज सांयकाळी अँजियोप्लास्टी होणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर ३ डॉक्टर हे गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत, सौरव गांगुलीची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. हर्षा भोगले यांनीही गांगुली लवकरात लवकर बरे व्हावे अशी असं म्हटलं आहे. या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

सौरव गांगुली हा आक्रमक भारतीय कर्णधार म्हणून ओळखला जातो. भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस दाखवणारा कर्णधार म्हणून जगभरात सौरव गांगुलीची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. गांगुलीच्या नेतृत्वातच भारताने मोठ्या टीमविरुद्ध विजय मिळवायला सुरूवात केली. २००३ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली होती. तसंच २००४ साली पाकिस्तान दौऱ्यातही भारताचा विजय झाला होता.  इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीनं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्या नंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी केल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. गांगुलीच्या नेतृत्वातच भारताने मोठ्या टीमविरुद्ध विजय मिळवायला सुरूवात केली. २००३ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली होती. तसंच २००४ साली पाकिस्तान दौऱ्यातही भारताचा विजय झाला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गांगुलीने क्रिकेट प्रशासनामध्ये एन्ट्री घेतली. काही वर्ष गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होते, यानंतर मागच्याच वर्षी गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments