ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. ३२८ धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.
CHAMPIONS #TeamIndia pic.twitter.com/hintWt3MEe
— BCCI (@BCCI) January 19, 2021
अॅडलेड कसोटीमधील लाजिरवाणा पराभव ते मालिका विजय, भारताचा हा विजय निश्चितच कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत भारताचा संपूर्ण संघ ३६ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला आणि संघाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. मेलबर्न कसोटीत भारताने दमदार खेळी केली. त्यानंतरची सिडनी कसोटी भारताने ड्रॉ केली. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारतासाठी विजयापेक्षा कमी नव्हता. मग अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकत होता. ३२८ धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने सुरुवातीला बचावात्मक खेळ केला. त्यामुळे भारत हा कसोटी सामना ड्रॉ करण्याच्या प्रयत्नात असल्याचं चित्र होतं. परंतु शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे सामन्याचं चित्र पालटलं आणि हा सामना तीन विकेट्सनी जिंकला.
युवा फलंदाज शुभमन गिलने ९१ धावांची खेळी केली. त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताचा डाव उभारला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही २४ धावा करुन माघारी परतला. मग चेतेश्वर पुजाराने रिषभ पंतला योग्य साथ देत संयमी फलंदाजी केली. ५६ धावा करुन तोही माघारी परतला. यानंतर रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या बोर्डर वर नेऊन ठेवले. जिंकण्यासाठी दहा धावांची गरज असताना सुंदर २२ धावा करुन बाद झाला. यानंतर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना शार्दुल ठाकूर 2 धावा करून माघारी परतला. मग रिषभ पंतने 89 धावा करून विजयी चौकार लगावला आणि सामन्यासह मालिका जिंकली.
गाबा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना खेळला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ३२८ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने हे लक्ष्य ९७ षटकांत ७ विकेट्स गमावू ३२९ धावा करत हा सामना जिंकला. त्यामुळे भारतीय संघाने बॉर्डर गावसकर मालिका आपल्या नावावर केली. एबी डिविलियर्स भारतीय संघाचे अभिनंदन करताना ट्विट केले की, “काय, कसोटी सामना होता! भारतीय क्रिकेट संघाच्या प्रतिभेचा स्तर भयानक आहे. रिषभ पंत, हा तरुण खेळाडू छान खेळला. कसोटी क्रिकेट हे सर्वात बेस्ट क्रिकेट आहे.” हे ट्विट करताना त्याने हे ट्विट करताना रिषभ पंतचा उल्लेख देखील केला आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “बीसीसीआयने भारतीय संघासाठी ५ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. हा भारतीय क्रिकेटमधील काही निवडक आणि विशेष क्षणांपैकी एक क्षण आहे. भारतीय संघा ने उत्तम खेळ आणि उत्तम कौशल्य दाखवले आहे.” कप्तान अजिंक्यने सामना संपल्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मिळाली असता ती स्वतःकडे न ठेवता आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या टी नटराजनकडे सोपवली. अजिंक्यच्या या कृतीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे.