Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket युवराजची मागणी फेटाळली

युवराजची मागणी फेटाळली

बीसीसीआयनं आपल्या नियमावलीमध्ये कोणतेही बदल न करता युवराजची मागणी नाकारल्याचं कळत आहे. या नियमांअंतर्गत देशाबाहेरील कोणत्याही क्रिकेट लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करता येत नाही. आयपीएलही याला अपवाद नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, युवराजने बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुली याला पत्र लिहित भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची विचारणा केली होती. पण, परदेशातील संघांचा भाग असल्यामुळं त्याच्यामुळं बीसीसीआयने नियमांमध्ये कोणताही बदल न करता त्याची मागणी फेटाळल्यालं म्हटलं जात आहे.

युवराजच्या क्रिकेट कारकिर्गीबाबत सांगावं तर, युवराज सिंग भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत. २००० सालापासुन युवराज भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. त्यांनी पहिला कसोटी सामना २००३ मध्ये खेळला. तो २००७ ते २००८ पर्यंत भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले. त्यांला फुफ्फुसाचा कर्करोग होता. त्यांने २०११ मध्ये कर्करोगाच्या गाठीचा उपचार करून घेतला. केमोथेरपी चा उपचार त्यांनी इंडिअन पालिस मध्ये बोस्टन या ठिकाणी केला. त्याचा हा उपचार २०१२ मध्ये पूर्ण झाला आणि तो एप्रिल महिन्यात भारतामध्ये परत आला. ऑगस्ट २०१८ मध्ये पॉवर ब्रॅण्ड्सने युवराजसिंगला भारतीय मानवता विकास पुरस्कार देण्यात आला. कारण त्यांची मैदानातील प्रभाव खेळाडू म्हणून आणि लोंकांबद्दल नम्रता दाखविल्याबद्दल आणि कर्करोगाविरूद्ध त्यांच्या लढाई बद्दल.

युवीने ४० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्त्वं केलं होते. तर, ३०४ एकदिवसी आणि ५८  टी-२०सामन्यांत तो सहभागी होता. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं १९०० धावा,  एकदिवसीय सामन्यात ८७०१ धावा आणि टी-२०  सामन्यांत १११७ धावांचं योगदान संघासाठी दिलं होतं. २००७ चा टी-२०  विश्वचषक त्याने गाजवला होता. इंग्लंड विरोधातील सामन्यांत एका षटकातील प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकत अर्थात ६ चेंडूंवर ६ षटकार मारत त्यानं विरोधी संघाची त्रेधातिरपीट उडवली होती.

जवळपास २० वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवल्यांतर २०१९ मध्ये जून महिन्यात त्यानं क्रिकेटला रामराम ठोकला. पण, निवृत्तीनंतरही तो विविध लीग सामन्यांमध्ये खेळताना दिसला. कॅनडामध्ये टोरंटो नॅशनल संघाचं प्रतिनिधित्त्व त्याने केलं होतं. तर, अबु धाबी टी-१० लीगमध्ये मराठा अरेबियन्स या संघाचाही तो भाग होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काढता पाय घेतलेला असतानाही तो स्थानिक क्रिकेटमध्ये परतण्याची आशा बाळगून होता. पण, बीसीसीआयनं त्याची ही मागणी नाकारली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments