Friday, February 26, 2021
Home Sports News २०२० मध्ये निवृत्त झालेल्या प्रसिद्ध महिला खेळाडू

२०२० मध्ये निवृत्त झालेल्या प्रसिद्ध महिला खेळाडू

कोरोना लॉकडाउनमुळे जवळपास चार महिने क्रीडाजग थंडावलेले होते. या काळात जगभरातील अनेक खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला. जगभरात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे वर्षातील अनेक महिने लॉकडाउनमध्ये गेले. तसेच खेळाडूंनाही त्यांच्या घरांमध्ये बंदिस्त राहावे लागले. त्याचबरोबर बर्‍याच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सामनेदेखील पुढे ढकलणे किंवा रद्द करणे भाग पडले. आज आपण जाणून घेऊया २०२० मध्ये निवृत्ती घेतलेल्या पाच सुप्रसिद्ध महिला खेळाडूंविषयी.

दीपा मलिक –

Deepa Malik

भारताच्या दिव्यांग खेळाडू दीपा मलिक. रिओ पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यांना दिला गेला होता. पॅरालंपिक स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक होते. यासह, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला पॅरा अ‍ॅथलीट ठरल्या. मात्र, दीपा मलिक यांनी अचानकपणे ११ मे २०२० रोजी अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली.

मारिया शारापोवा –

Maria Sharapova

जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू म्हणून ओळखली जाणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिने देखील याच वर्षी निवृत्तीची घोषणा केली. आपल्या कारकीर्दी दरम्यान नेहमीच चर्चेत राहिलेल्या शारापोवाने २६ फेब्रुवारी रोजी टेनिसला कायमचा अलविदा केला. तिने आपल्या कारकीर्दीत तीन ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत.

कॅरोलीना वोज्नियाकी –

Caroline Wozniacki

डेन्मार्कची अव्वल टेनिसपटू कॅरोलीना वोज्नियाकी हिने देखील याचवर्षी स्पर्धात्मक टेनिसला अलविदा केला. तिने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. वोज्नियाकीने आपल्या कारकीर्दीत ३० डब्ल्यूटीए विजेतेपदे व १ ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम जिंकले होते. २०१० व‌ २०११ अशी सलग दोन वर्ष ती महिला टेनिसपटूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी होती.

लॉरा मार्श –

Laura Marsh

इंग्लंडची माजी दिग्गज महिला क्रिकेटपटू लॉरा मार्श हिनेदेखील याच वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडसाठी ९ कसोटी, १०३ वनडे व‌ ६७ टी२० सामने खेळलेल्या लॉराने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महिला टी२० विश्वचषकानंतर निवृत्ती स्वीकारली. लॉराने २००७ ते २०१९ या काळात तीन वेळा इंग्लंडला विश्वविजेते बनण्यात सहभाग होता.

सना मीर –

Sana Meer

चालू वर्षात निवृत्ती घेणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये अनुभवी महिला क्रिकेटपटू सना मीर हीचेही नाव आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि सर्वात अनुभवी क्रिकेटपटू असलेल्या सना हिने आपल्या १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला रामराम ठोकला. यावर्षी एप्रिलमध्ये तिने निवृत्तीची घोषणा केली. सना मीरने आपल्या कारकीर्दीत पाकिस्तानकडून २२६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यातील १३७ सामन्यांमध्ये तिने राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले.

खेळांच्या दृष्टीने २०२० हे वर्ष अत्यंत निराशाजनक राहिले. कोरोन काळात परिस्थितीत काहीशी सुधारणा झाल्यानंतर अनेक पेंडिंग स्पर्धा घेण्यासाठी त्या स्पर्धा विना प्रेक्षकही खेळवाव्या लागल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments