Sunday, March 7, 2021
Home Sports News Cricket भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना

५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ ५ सामन्यांची टी-२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिकेत आमने-सामने येतील. भारताने ऑस्ट्रेलियाला परदेशात पराभूत केले तर इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्या घरीच पराभूत केल्याने दोन्ही संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. विराट कोहलीसह अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली तर, जो रुटच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघानेही चांगली कामगिरी केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईत तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या प्रसिद्ध मोटेरा स्टेडियमवर खेळले जाणार आहे. विशेष म्हणजे, तिसरी कसोटी डे नाईट खेळवली जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला आणि दुसरा कसोटी सामना चेन्नई मैदानात खेळण्यात येणार आहे. पहिला सामना ५-९ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. तर, दुसरा सामना १३-१७ फेब्रुवारी पार पडणार आहे. हे दोन्ही सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास होणार आहे. तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे २४-२८ फेब्रुवारी डे-नाईट खेळला जाणार आहे. चौथा आणि अखेरचा सामना ४-८ मार्चला अहमदाबाद येथे होणार आहे. चेन्नईत आतापर्यंत झालेल्या ३२ पैकी १४ कसोटी भारतीय संघाने विजय मिळवला आहे. सहा सामन्यात पराभव झाला तर ११ सामने ड्रॉ झाले आहेत. या शिवाय चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या ९ पैकी ५ कसोटी विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय टीम नक्कीच वरचढ ठरेल असे वर्तविले जात आहे.

दरम्यान, पहिल्या दोन टेस्टसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर झाले आहेत. त्यानुसार टीम इंडियाच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंचे पुनरागमन झालं आहे. याशिवाय नियमित कर्णधार विराट कोहली,  इशांत शर्मा आणि केएल राहुल, हार्दिक पंड्याचाही सहभाग नोंदवला गेला आहे.

पहिल्या २ टेस्टसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या २ टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच असा संघ आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments