Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket भारताचा फर्स्ट डे फर्स्ट सामना फ्लॉप !

भारताचा फर्स्ट डे फर्स्ट सामना फ्लॉप !

शुक्रवार पासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामने सुरु झालेल्या टीम इंडियाच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या तीन ट्वेंटी २० सामन्यांसाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच या सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने ५० टक्के लोकांना प्रवेश देण्याचे जाहीर केलं. या निर्णयामुळं पाहता पाहता सामन्यांच्या तिकीटांची विक्री झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ही सारी तिकीटं लागोलाग संपल्याचं पहायला मिळालं. जगाच्या पाठीवर कुठेही क्रिकेटचा सामना खेळवला जावो, त्या ठिकाणी भारतीय क्रिकेटप्रेमी पोहचतात. तसेच जगातल्या अनेक देशांत मूळ भारतीय वंशाची लोकं वेगवेगळ्या कारणानिमित्त स्थायिक झालेले आहेत. त्या देशात भारताचा क्रिकेट सामना असेल तर संघाला पाठिंबा देण्यासाठी मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा उत्साह ओसांडून वाहतो. तब्बल आठ महिन्यांनी स्टेडियम इंडिया इंडिया च्या नावाने गजबजले. सिडनीतल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने भारतीय प्रेक्षक वाजतगाजत स्टेडियमवर दाखल झाले. आजच्या सामन्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी दाखवलेला उत्साह पाहण्यासारखा होता. त्यामुळं लहानापासून ते वयोवृध्दापर्यंत सर्व प्रेक्षकांना काही काळ कोरोनाचा विसर पडल्याचं दिसून आले.

टीम इंडियाच्या आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७ नोव्हेंबरला पहिला एकदिवसीय सामना खेळण्यात आला. ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारत टीम इंडियाला विजयासाठी ३७५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला निर्धारित ५० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून ३०८ धावाच करता आल्या. टीम इंडियाकडून शिखर धवन आणि हार्दिक पंड्याने लक्षणीय खेळी केली. शिखर धवनने ८६ चेंडूत ७४ धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने ७६ चेंडूत ७ फोर आणि ४ सिक्ससह ९०  धावांची धडकेबाज खेळी केली. हार्दिक टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात वेगवान १ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. हार्दिकने टीम इंडियाकडून सर्वात कमी चेंडूत १ हजार धावा केल्या.

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत ०–१ अशी पिछाडी झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाने विजयी सुरुवात केली. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची पराभवाने सुरुवात झाली. टीम इंडियाला मालिकेत टिकून राहण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना रविवार २९ नोव्हेंबरला सिडनीत खेळला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments