आज पासून सुरु झालेल्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 सामान्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑल राउंडर हार्दिक पांड्याने दमदार खेळी केली. पांड्याने या सामन्यात ७६ चेंडूंमध्ये नाबाद ९२ धावांची खेळी केली होती. त्या व्यतिरिक्त रविंद्र जडेजाने नाबाद ६६ आणि विराट कोहलीने ६३ धावा केल्या होत्या. त्यामुळे सर्वांचे लक्ष आज पासून सुरु झालेल्या टी-२० सीरिजकडे लागले आहे.
टीम इंडियानं कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केलं. कॅनबेराच्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचं आव्हान दिले होते. लोकेश राहुल आणि रविंद्र जाडेजाच्या दमदार खेळीनंमुळे टीम इंडियाला २० षटकात ७ बाद १६१ धावांची मजल मारता आली. राहुलने ४० चेंडूत ५१ धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजानं २३ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॉईझेस हेन्रिक्सने तीन फलंदाजांना आउट करून माघारी पाठविले. तर मिशेल स्टार्कनं दोन विकेट्स घेतल्या. भारताने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाला सात बाद १५० धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून नटराजनने ३० धावात ३ विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जाडेजाच्या जागी मैदानात उतरलेल्या चहलनंही ३ फलंदाजांना माघारी पाठवले. या विजयासह टीम इंडियानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात मिशेल स्टार्कच्या चेंडूमुळे फलंदाजी करणाऱ्या रविंद्र जाडेजाच्या डोक्याला लागला. त्य़ामुळे जाडेजाला क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर जाता आले नाही. त्यामुळे Concussion सबस्टिट्यूट नियमानुसार कर्णधार विराट कोहलीनं सबस्टिट्यूट म्हणून युजवेंद्र चहलला मैदानात उतरवले. हा नियम लागू झाल्यापासून युजवेंद्र चहल हा Concussion सबस्टिट्यूट म्हणून खेळणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. या सामन्यात लेग स्पिनर युजवेंद्र चहलने मोलाची भूमिका बजावली. पण महत्वाची बाब अशी की सामन्याच्या सुरुवातीला अंतिम अकरामध्ये युजवेंद्र चहलचा या मध्ये समावेश नव्हता. पण Concussion (कन्कशन) सबस्टिट्यूट या आयसीसीच्या नव्या नियमानुसार चहलची दुखापतग्रस्त रविंद्र जाडेजाच्या जागी वर्णी लागली. आणि त्यानं पूर्ण चार षटकं गोलंदाजीही केली आणि ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या जबरदस्त खेळामुळे टीम इंडियाने कॅनबेराच्या पहिल्या टी-२० च्या पहिल्या सामन्यात आपली यशाची मुहूर्तमेढ रोवली.