भारताने १९३२-३३ सीजनमध्ये आपला पहिला कसोटी सामना इंग्लंड विरोधात खेळला होता. त्या सीरिजमध्ये भारतीय संघाचे कर्णधार सीके नायडू होते. यामुळे भारतासाठी कसोटी सामना खेळणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान सीके नायडू यांना दिला जातो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. एकापोठापाठ एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल राहुल, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा अशा खेळाडूंना ऑस्ट्रेलियात दुखापत झाली आहे.
त्यामुळे नाईलाजास्तव टीम इंडियामध्ये चार बदल करावे लागले. दुखापतींचं ग्रहण लागलेल्या भारतीय संघाला अखेरच्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात चार बदलांसह मैदानात उतरावं लागलं. या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमरा आणि आर अश्विन शिवायच मैदानात उतरला आहे. त्यातच नवदीप सैनीला दुसऱ्या सत्रात दुखापत झाली आणि त्याला तपासणीसाठी पाठवण्यात आलं. याच बदलांमुळेच स्टार गोलंदाज टी नटराजनला वनडे, टी-२० नंतर ब्रिस्बेन कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. टी नटराजन भारताच्या वतीने कसोटी सामना खेळणारा ३०० वा खेळाडू बनला आहे. तसेच एकाच दौऱ्यावेळी तीनही नटराजन व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरही ब्रिस्बेन कसोटीमध्ये डेब्यू करत आहे. सुंदरलाही नेट बॉलर म्हणूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेण्यात आलं होतं. आता नटराजन भारतासाठी कसोटी सामना खेळणारा ३०० वा खेळाडू आणि सुंदर ३०१ वा खेळाडू ठरला आहे. फॉर्मेटमध्ये म्हणजे, वनडे, टी-२० आणि कसोटी सामन्यांत पदार्पण करणारा पहिलाच खेळाडू बनला आहे. भारतासाठी कसोटी सामना खेळणारा १००वा, २००वा कसोटी क्रिकेटर कोण होते, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी सामने खेळणारा १००वा खेळाडू बबलू गुप्ते होते. मुंबईत राहणाऱ्या गुप्ते यांनी नॉरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघात कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यांनी टीम इंडियासाठी केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी सामने खेळणाऱ्या २०० व्या खेळाडूंचं करिअर खरंच फार मोठं होतं. विकेटकीपर फलंदाज नयन मोंगिया यांनी १९९४ मध्ये श्रीलंकेविरोधात लखनौमध्ये पदार्पण केलं होतं. तो भारतासाठी ४४ कसोटी सामने खेळला आहे.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया एक-एक असे बरोबरीत आहेत. अॅडलेडमधील पहिला कसोटी सामना भारताने गमावला. त्यानंतर मेनबर्न कसोटीत भारताने जबदस्त कमबॅक केलं. सिडनीमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे आता चौथ्या आणि अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीचा जो निकालावरुनच बॉर्डर-गावस्कर मालिका कोण जिंकणार याचा फैसला होणार आहे.