Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket एकेकाळी विश्वचषक गाजवणारा उपजीविकेसाठी करतोय वणवण

एकेकाळी विश्वचषक गाजवणारा उपजीविकेसाठी करतोय वणवण

क्रिकेट म्हंटलं की आपल्यासमोर उभे राहतात ते गावस्कर, तेंडुलकर, कपिल देव, विराट कोहली असे दमदार खेळाडू ! आणि ते अगदी साहजिकच आहे, या खेळाडूंनी स्वतःच असं एक स्थान निर्माण केलं आहे!  क्रिकेट हा भारतीयांसाठी फक्त खेळ नाही, तर तो धर्म आहे. क्रिकेट म्हणजे भारतीयांचा श्वास आहे. क्रिकेट शिवाय जगण्याचा विचार केलाचं जाऊ शकत नाही. अगदी गल्लीचा कोपरा,  इमारतींची गच्ची अशा कुठल्याही ठिकाणी क्रिकेटचा खेळ रंगताना दिसतो. स्पर्धात्मक क्रिकेट खेळणारा प्रत्येक खेळाडू,  भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहत असतो. एकदा तरी भारतीय संघात स्थान मिळावं अशी अपेक्षा करणं, किंवा खरं तर स्वप्न पाहणं हा प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतोच! सचिन, सेहवाग,  द्रविड,  झहीर,  धोनी,  विराट,  रोहित, बुमराह इत्यादी अनेक क्रिकेटर्स भारतीयांचे आदर्श असतात. शेवटी आपल्या देशाची जर्सी घालून देशासाठी विश्वचषक खेळणं हे तर प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. आणि ज्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतं ते खरंच नशीबवान असतात. आज तर क्रिकेट हा केवळ एक खेळ राहिला नसून एक करिअर ऑब्जेक्टिव्ह बनला आहे. एकदा का भारतीय क्रिकेट टीममध्ये सामील झालं तर तुमचं करिअरच बनून जाते असे समीकरण बनले आहे.

पण असा कुणी खेळाडू आठवतोय का त्याचं कर्तृत्व तेवढं मोठं असून देखील त्याला एवढी प्रसिद्धी कधीच मिळाली नाही ? आज आपण पाहूया अशाच एका खेळाडूची माहिती. भालाजी डामोर हे एक असे खेळाडू होते, ज्यांनी १९९८ सालच्या वर्ल्डकपमध्ये एका ऑलराउंडर खेळाडूच्या रुपात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ह्याच खेळाडूच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारताने सेमी फायनल पर्यंतची मजल गाठली होती. १९९८ च्या ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भालजी हे एक हिरो म्हणून समोर आले होते. ऑलराउंडर भालजी ह्यांच्या नावे नेत्रहीन क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट म्हणजेच १५० विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे. भालजी डामोर यांनी एक फलंदाज म्हणून ३००० पेक्षा अधिक धावा काढल्या असून दुर्दैवाने सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, सध्या त्यांचे मासिक वेतन हे केवळ ३००० रुपये इतकेच आहे. गुजरातच्या एका साधारण शेतकरी कुटुंबातील नेत्रहीन भालजी ह्यांना वाटायचं की वर्ल्डकप नंतर त्याचं जीवन थोडं सुधारेल. पण तेवढी त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही. १९९८ च्या वर्ल्डकपला आज २२ वर्ष उलटली पण देशाचं नावं क्रिकेट विश्वात गाजवणारे भालाजी आजही त्याच परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत. आजही त्यांना पोटाची खळगी भागविण्यासाठी म्हशी चारत फिरावे लागत आहे. अंध असून सुद्धा त्यांनी आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मध्ये इतके मोठे योगदान देऊन सुद्धा आज त्यांच्यावर ही वेळ येणं अत्यंत दुर्दैवी आहे. आज ज्या माणसाने दिसत नसूनही देशाला विश्वचषकात मोठं नाव मिळवून दिलं, त्याच्या हलाखीच्या परीस्थितीत लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

bhalaji damor

तत्कालीन राष्ट्रपती के नारायण यांनी देखील त्यांच्या उत्कृष्ट खेळाची प्रशंसा केली होती. आणि आज त्याच खेळाडूला एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागत आहे. “गुजरात सरकारने त्यांची प्रशंसा तर केली पण त्यांना एक चांगली नोकरी देऊ शकले नाही.” आज जिथे आपल्या देशात क्रिकेटला आणि क्रिकेटर्सला देखील अक्षरशः डोक्यावर घेतात. आणि त्याच्या जोरावर ते करोडो कमावतात एवढचं नाही तर त्यांना चांगल्या पदाची नोकरी देखील दिली जाते. भालाजी डामोर यांच्याच बाबतीत हे सगळं का शक्य झालं नाही याची खंत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना लागून राहिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments