मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याबाबतचे विधेयक ठेवण्यात आले होते. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांनी या विधेयकास मंजुरी दिली. त्यामुळे आता पुढल्या वर्षी जून २०२१ महिन्यापासून सुरु होणार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील विविध विभागांत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, भविष्यात या क्षेत्रामधून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, या सर्व बाबीं डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र राज्य सरकारकडून देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. पुण्यातील बालेवाडी येथे हे विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी दिली. अभ्यासक्रम शिकण्यासाठी सुरुवातीला पहिल्या ५० जणांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. अभ्यासक्रम प्रवेशासाठी लागणाऱया निकषाबाबत अद्याप काही सांगण्यात आलेले नाही. पण नियम तयार केले जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली. तसेच बारावीनंतर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाकडे वळता येईल. क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान व क्रीडा प्रशिक्षण, सराव या अभ्यासक्रमाला पहिल्यांदा सुरुवात केली जाणार आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध खेळांचे प्रशिक्षण व शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येतील, असे महाराष्ट्र सरकारचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या जडणघडणीसाठी सर्व क्रियाकलाप व संशोधन कार्य येथे सुरू होईल. यासाठी पुण्याचे बालेवाडी क्रीडा संकुल सुधारीत केले जाईल. याच कॉम्प्लेक्सने २००८ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन देखील केले होते. अपग्रेड नंतर, जगभरातील एलिट स्पोर्ट्स प्रशिक्षक आणि संशोधक येथे आणले जातील. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी असा दावा केला आहे की या विद्यापीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण व संशोधन व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. त्याचप्रमाणे या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध खेळांचे प्रशिक्षण व शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येतील, असे महाराष्ट्र सरकारचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
या क्रीडा विद्यापीठाच्या बांधकामाबाबत भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपचे म्हणणे आहे की, मागील फडणवीस सरकारच्या काळात औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यासाठी जमीनही निश्चित केली गेली होती. महाविकास आघाडी सरकारवर आरोप करीत भाजप नेते हरिभाऊ बागडे म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकार औरंगाबादमधील यापूर्वीच प्रस्तावित क्रीडा विद्यापीठाचा प्रकल्प पुण्यात हलवित आहे.