Thursday, February 25, 2021
Home Sports News Athletics सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत शासकीय नोकरीसाठी मेरा नंबर कब आयेगा ! विवंचनेत

सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत शासकीय नोकरीसाठी मेरा नंबर कब आयेगा ! विवंचनेत

सावरपाडा एक्सप्रेस याच नावाने प्रसिद्ध असलेली नाशिक ३४ वर्षीय कविता राऊत ही आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याची धावपटू आहे. दहा किलोमीटरचे अंतर केवळ ३४ मि आणि ३२ सेकंदात पार करण्याचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला धावपटू आहे. कविताने आशियाई स्पर्धेतही रौप्य पदकाची कमाई केली आहे. तिला अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या कविताने अनन्यसाधारण यश संपादन केले आहे. ज्या पाड्यात ती लहानाची मोठी झाली, त्याच नावाने तिला ओळखण्यात येते. शासकीय नोकरी मिळण्यासाठी विलंब होत असल्यामुळे कविता राऊतनं २०१४ साला पासून वर्ग एकच्या पदासाठी अर्ज केलेल्याची फाईल अद्याप पुढेच सरकलेली नाही. माझ्यानंतर अर्ज केलेल्या काही खेळाडूंची वर्ग एकच्या पदासाठी शासकीय सेवेत नियुक्ती झाली असून मी अजूनही नोकरीच्या प्रतिक्षे आहे. मी वेळोवेळी पाठपुरावा करूनही अद्याप मला न्याय मिळालेला नाही. पुढे बोलताना तिने सांगितलं की, ‘सध्या माझी पोस्टिंग देहरादूनला ओएनजीसीमध्ये करण्यात आली आहे. पण मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाली आहे आणि ग्रामीण भागांतील खेळाडूंच्या समस्या माझ्यापेक्षा जास्त कोणाला समजू शकतात! मला महाराष्ट्रासाठी माझ्या ग्रामीण भागांतील खेळाडूंसाठी मला काम करायचं आहे. हाच विचार समोर ठेवून मी अर्ज केला होता. परंतु अद्यापही मला न्याय मिळालेला नाही.’ यामध्ये मला अनेक मंत्र्यांनीही मदत केली. पण तरी काम न झाल्यामुळे “माझं कुठं चुकतंय किंवा मी खेळात कुठे कमी पडलेय का? हा गहन प्रश्न माझ्यासमोर मला पडला आहे.” तसेच कविताने बोलताना ‘राज्यपालांना भेटणं हा माझा शेवटचा पर्याय होता. शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी येत आहेत. माझी फाईल तिथून पुढे जात नाही आहे. २०१८ मध्ये ज्या ३३ खेळाडूंची यादी लागली होती, परंतु त्यातही माझे नाव नव्हते, असंही कविता राऊतनं सांगितलं आहे.

sawarpada express kavita raut

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनं न्याय मिळावा म्हणून राज्यपालांकडे धाव घेऊन नोकरी संदर्भात होत असलेल्या अन्यायाची कैफियत कविता राऊतनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपुढे मांडली आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनं राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कविता राऊतनं भारताला पदकं मिळवून दिली आहेत. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून तिनं सहभाग घेतला होता. देशाचे नाव एवढ्या मोठ्या स्तरावर उंच नेऊनही शासकीय नोकरीसाठी कविता मेरा नंबर कब आयेगा ! या विवंचनेत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments