Friday, February 26, 2021
Home Sports News स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने रचला नवीन विक्रम

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने रचला नवीन विक्रम

जगभरात फुटबॉलचे वारे जोरात वाहात आहे. संघातील प्रत्येक खेळाडू विजयासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसत आहे. पण, म्हणून काही सर्वच खेळाडू खूप लोकप्रिय असतात आणि त्यांची कमाईही तितकीच भरपूर असते असे मुळीच नाही. प्रचंड लोकप्रियता आणि तितकीच कमाई हे काही खेळाडूंच्याच बाबतीत घडते. अर्थात त्यामागे त्यांचे कष्टही तितकेच असते हा भाग वेगळा आणि तितकाच महत्वाचा आहे. मेस्सी बार्सिलोनासाठी स्पॅनिश लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले आहेत. मेस्सीने २००५ साली बार्सिलोनासाठी पहिला गोल केला होता. पुढे आपल्या रंगतदार खेळाच्या जोरावर मेस्सीने १० ला लिगा टायटल्स आणि ४ चॅम्पियन्स लीग जिंकले. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आणखी एक विक्रम रचला आहे. मेस्सीने ब्राझिलचे विख्यात फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम मोडला आहे. मेस्सीने बार्सिलोना या त्यांच्या क्लबसाठी रिअल वॅलाडोलिड क्लबविरोधात खेळताना दोन गोल करत एकूण ६४४ गोल केले आहेत. याआधी १९५६ ते १९७४ या कालखंडात पेले यांनी १९ व्या सिझनमध्ये ब्राझिलच्या सांतोस क्लबसाठी ६४३ गोल केले होते.

स्पॅनिश फुटबॉलच्या ला लीगा स्पर्धेत बार्सिलोनाने रिअल वॅलाडोलिडला ३.० ने पराभव केला. मेस्सीने दोन गोल केले. या विजयासह बार्सिलोना ८ अंकासह पाचव्या स्थानावर आहे. तर एटलेटिको मॅड्रीडने तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या रिअल सोशिदादला २-० ने नमवत बढती कायम ठेवली आहे. बार्सिलोनासाठी विक्रम रचणाऱ्या मेस्सीचा पुढच्या वर्षी जूनमध्ये क्लबशी करार संपणार आहे. जानेवारी पासून तो नव्या करारासाठी इतर क्लबशी बोलणी सुरू करेल. मेस्सीने ऑगस्ट महिन्यातच बार्सिलोना सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या करारात निशुल्क ट्रान्सफरची तरतूद असल्याचे मेस्सीने म्हटले होते. बार्सिलोना क्लबने मात्र याचा इनकार केला आहे. क्लब सोडण्याआधी मेस्सीला ७०० मिलियन युरो म्हणजे जवळपास ६२४ मिलियन डॉलर्सची अट पूर्ण करावी लागेल,  असे क्लबतर्फे सांगण्यात आले आहे. बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सी याने सर्वाधिक ६४४ गोल झळकावण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या दमदार कामगिरीमुळे बार्सिलोनाने ३–० असा पराभव करत ला-लीगा फुटबॉलमध्ये पाचवे स्थान पटकावले आहे. मेस्सीने पेले यांच्या ६४३ गोलाच्या विक्रमाशी बरोबरी साधून नवीन विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. तो स्व:ताही आपल्या रचलेल्या विक्रमावर प्रचंड खुश असून त्याने कधी असा विक्रम घडेल असा विचार केला नव्हता असे म्हटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments