Thursday, February 25, 2021
Home Sports News अमेरिकन ओपन स्पर्धेतून जोकोविच नोवाक बाहेर

अमेरिकन ओपन स्पर्धेतून जोकोविच नोवाक बाहेर

सर्बियाचा जोकोविच आणि स्पेनचा पाब्लो करेनो बुस्टा यांच्यात सामना सुरू होता. बुस्टाविरुद्धच्या लढतीत जोकोविच पहिल्या सेटमध्ये ५-६ अशा पिछाडीवर होता. तेव्हा त्याने रागाच्या भरात चेंडू मारला. जो एका कोर्टवर उभ्या असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला लागला आणि त्या खाली पडल्या. संबंधित महिला अधिकाऱ्याला श्वास घेण्याचा त्रास होत होता. काही मिनिटांनी त्या तेथून निघून गेल्या. महिलेला चेंडू लागल्याची चूक लक्षात आल्यावर जोकोविच तातडीने त्याच्याकडे केला. या घटनेनंतर जोकेविच मान खाली घालून मैदानाबाहेर केला. कोर्टवर झालेल्या घटनेवर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, या पूर्ण घटनेवर मी दु:खी आहे. मी लाइन पर्सनशी बोललो आणि अधिकाऱ्यांनी मला सांगितले की त्या ठिक आहेत. माझ्यामुळे त्यांना झालेल्या दु:खा बद्दल मला वाइट वाटते. पण मी मुद्दाम तसे केले नाही. जे झाले ते चूकीचे होते त्यामुळे माझ्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. यावर आता मला विचार करावा लागले आणि स्वत:च्या निराशेवर काम करावे लागेल. एक चांगला खेळाडू आणि व्यक्ती होण्यासाठी प्रेरणा म्हणून त्याचा वापर करावा लागेल.  या घटनेनंतर रेफरी सोरन फ्रीमल यांनी अंपायरशी १० मिनिटे चर्चा केली आणि जोकोविचचा प्रतिस्पर्धी बुस्टाला विजयी घोषित करण्यात आले. अमेरिकन ओपन आणि त्याच्याशी संबंधित सर्व व्यक्तींकडे मी यासाठी माफी मागतो. तसेच माझ्या संघातील सहकारी आणि समर्थकांचे आभार मानतो. धन्यवाद आणि आय एम सॉरी !

Novak Djokovic

या घटनेवर बोलताना जोकोविचचा प्रतिस्पर्धी बुस्टा देखील म्हणाला, ही घटना धक्कादायक होती. तो कोणाशी काहीही न बोलता बाहेर गेला. पण नियम तो नियम असतो. रेफरींनी जो निर्णय घेतला तो योग्य आणि अंतिम होता. ही सोपी गोष्ट नव्हती. रॉजर फेडरर आणि राफेल नडाल या दोघांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने या वर्षी अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाचा मुख्य दावेदार जोकोविच यालाच मानला जात होता. जोकेविचने आतापर्यंत १७ ग्रॅड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तर फेडररने २० आणि नडालने १९ विजेतेपद मिळवली आहेत. ग्रॅड स्लॅम स्पर्धेत अपात्र होणारा जोकोविच जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी १९९० साली जॉन मॉकेनरोला ऑस्ट्रेलियन ओपन आणि २००० साली स्टफान कोबेके याला फ्रेंच ओपनमधून अपात्र करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments