Saturday, March 6, 2021
Home Sports News Cricket IPL 2021 मध्ये ड्रोन शूटला परवानगी

IPL 2021 मध्ये ड्रोन शूटला परवानगी

केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला इंडियन प्रीमिअर लीग २०२१ स्पर्धेसह अन्य क्रिकेट सत्रात ड्रोन वापरण्याची परवानगी दिली आहे. बीसीसीआय एरियल सिनेमॅटोग्राफी साठी ड्रोनचा वापर करणार आहे. केंद्र सरकारने यासाठी बीसीसीआयला सतर्श परवानगी दिली. या वर्षी एप्रिलपासून सुरू होणारा आयपीएलचा १४ वा हंगाम ड्रोनद्वारे आयोजित केली जाणारी पहिली स्पर्धा असेल. नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव अंबर दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोन इकोसिस्टम देशात वेगाने विकसीत होत आहे. याचा वापर कृषी, आरोग्य आणि नैसर्गिक संकटाच्या काळात तसेच क्रीडा क्षेत्रात केला जात आहे.

कायदा मंत्रालया सोबत ड्रोन नियम २०२१ संदर्भात चर्चा सुरू असल्याचे दुबे यांनी सांगितले. मार्च २०२१ पर्यंत त्याला मंजूरी मिळेल असे वाटते. विविध कारणांमुळे मुंबई पोलिस ड्रोनच्या वापरावरून खुप अलर्ट आहे. मुंबईत देशातील सर्वात गर्दीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुरक्षेसंदर्भातील अन्य महत्त्वाची ठिकाणी आहेत. बीसीसीआयला देण्यात आलेली परवानगी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. या काळात ड्रोनचा वापर सर्व अटी आणि नियमांचे पालन करून करावा लागणार आहे. जर यापैकी एखाद्या नियमांचे उल्लंघन केले तर ही परवानगी रद्द केली जाऊ शकते.

wankhede stadium drone shoot

ड्रोनचा वापर करण्याआधी बीसीसीआयला स्थानिक प्रशासन, संरक्षण आणि भारतीय हवाई दल तसेच स्थानिक हवाई नियंत्रण कक्षाकडून मंजूरी घ्यावी लागणार आहे. ड्रोन द्वारे केल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडिओचा वापर फक्त आणि फक्त बीसीसीआय द्वारेच केला जाईल असे देखील स्पष्ट केले आहे. बीसीसीआय आणि मेसर्स क्विडिकडून हवाई छायाचित्रणासाठी रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाला विनंती करण्यात आली होती. नागरी उड्डाण मंत्रालयाचे सहसचिव अंबर दुबे म्हणाले, ड्रोन संकल्पना आपल्या देशात वेगाने विकसित होत आहे. याचा उपयोग कृषी, खाणकाम, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन ते क्रीडा व करमणुकीपर्यंत विस्तारत आहे. ड्रोन नियम २०२१ हे कायदा मंत्रालयाशी चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही मार्च २०२१ पर्यंत ते मंजूर होण्याची अपेक्षा करीत आहोत, असेही ते म्हणाले. देशातील ड्रोनच्या व्यावसायिक वापराला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या उद्देशाच्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments