Saturday, March 6, 2021
Home Sports News भारतीय महिला हॉकी संघात फलटणच्या मुलींची बाजी

भारतीय महिला हॉकी संघात फलटणच्या मुलींची बाजी

शेतकरी फलटण तालुक्यातील वाखरी येथील अक्षता ढेकळे, आसू येथील वैष्णवी फाळके व ऋतुजा पिसाळ या तीन मुलींची निवड भारतीय मुलींच्या हॉकी संघामध्ये झाली असून त्या चिलीला जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षदा ढेकळे, तिची आई व तिचा भाऊ आनंद यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी आपल्या भावना साश्रू नैनाने व्यक्त केल्या. वाखरी येथील ढेरे यांचे कुटुंब आहे. प्राथमिक शिक्षण वाखरीमध्येच जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीपर्यंत झाले. तिसरीमध्ये असतानाच तिची हॉकीमध्ये तालुका, सर्व जिल्हा स्तरावर निवड झाली आणि बालेवाडी येथे हॉकीसाठी प्रशिक्षण सुरू झाले. याठिकाणी ऑलिम्पियन अजित लाक्रा हे तिला प्रशिक्षक म्हणून लाभले. पुण्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षदाने आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला. यातून तिची भारतीय संघात निवड झाली.

भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघ, दि. १७ व १८ जानेवारी रोजी चिली येथे आयोजित हॉकी स्पर्धेत सहभागी होत असून कर्णधार सुमंत देवी यांच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघात फलटण तालुक्यातील अक्षदा ढेकळे (डिफेंडर), ऋतुजा पिसाळ (फॉरवर्ड) व वैष्णवी फाळके (मिडफिल्डर) यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. कोरोनानंतर खेळाची मैदाने काही प्रमाणात आता खुली झाली असून भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघ दि. १७ व १८ जानेवारी रोजी चिली येथे होणार्‍या हॉकी सामन्यांमध्ये सहभागी होत आहे. चिली महिला हॉकी संघाबरोबर २ सामने व उर्वरित ४ सामने चिली महिला वरिष्ठ संघासोबत खेळविण्याचे नियोजित करण्यात आले आहे. भारतीय जुनियर महिला हॉकी संघ ६ सामने खेळण्यासाठी चिली दौर्‍यावर जाणार असून भारतीय जुनियर महिला संघाने डिसेंबर २०१९ मध्ये न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया संघाबरोबर तीन देशांचे खेळामध्ये सहभाग घेतला होता. आता दि. १७ व १८ जानेवारी रोजी चिली येथे जुनियर संघाच्या स्पर्धा होणार आहेत. यानंतर दि. २०, २१, २३ व २४ जानेवारी रोजी चिली येथील सीनियर संघासोबत इतर ४ सामने होणार आहेत. भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाचे कोच एरिक वोनिंक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

अक्षदा ढेकळेच्या शेतकरी कुटुंबाने क्रीडा क्षेत्राशी असलेले नाते कायम ठेवले आहे. हाच वसा जपून आता अक्षता आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गस्थ झाली अाहे. तिचे वडील राज्यपातळीवर कुस्ती खेळले. तिची एक बहीण राज्यपातळीवर बॉक्सिंगमध्ये खेळली आहे. आता अक्षता ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार असल्याने आनंद झाला,  अशी प्रतिक्रिया तिच्या आईने दिली आहे. भारतीय महिला हॉकी संघात ३ मुलींची निवड झाल्याबद्दल फलटण तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments