Monday, March 1, 2021
Home Sports News Cricket प्लेअर ऑफ द मंथ रिषभ पंत

प्लेअर ऑफ द मंथ रिषभ पंत

रिषभ पंतने ऑस्ट्रेलियात जानेवारी महिन्यात सिडनी आणि ब्रिस्बेन येथे कसोटी सामने खेळले. सिडनी कसोटीत पंतने दुसऱ्या डावात पुजारासह १४८ धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, या कसोटीत त्याने शानदार ९७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे आणि आर अश्विन आणि विहारीने केलेल्या चिवट भागीदारीमुळे भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले होते. त्यानंतर ब्रिस्बेन येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात शेवटच्या डावात ३२८ धावांचे मोठे आव्हान समोर असताना पंतने दणकेबाज फटकेबाजी करताना नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताला अशक्य वाटणारे आव्हान पार करण्यात यश आले होते. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत २-१ असा ऐतिहासिक विजयही मिळवला.

Player of the Month Rishabh Pant

जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्लेअर ऑफ द मंथ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार आता जानेवारी या महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मिळाला आहे. पंतने या पुरस्कारासाठी नामांकन असलेल्या इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि पॉल स्टर्लिंग या क्रिकेटपटूंना मतदानात मागे टाकले आहे आणि हा पुरस्कार जिंकला आहे. पंतने जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २ कसोटी सामने खेळले होते. या दोन्ही कसोटीत त्याने शानदार कामगिरी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध जबरदस्त फलंदाजीने लाखो मनं जिंकणाऱ्या रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय दिग्गज जो रूट आणि पॉल स्टर्लिंग यांच्यावर मात करत मानाचा पुरस्कार पटकावला. सिडनी येथे पंतने ९७ धावा फटकावल्या आणि भारताला स्पर्धेत पुनरागमन करून बरोबरी मारण्यास निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर, गाबा येथे झालेल्या अंतिम सामन्यात पंतने सामन्यात नाबाद ८९ धावांची विजयी खेळी केली. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी महिन्याचा सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला ज्याचा पंत पहिला पुरुष खेळाडू ठरला. या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.  आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments