Monday, March 1, 2021
Home Sports News Cricket रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी फिट

रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी फिट

रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या कसोटी संघात रोहितचा समावेश करण्यात आला आहे. तर संजू सॅमसनला निवड समितीने भारताच्या एकदिवसीय संघात अतिरिक्त विकेटकीपर म्हणून सामील केले आहे. २७ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात झाली आहे. या दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयला मेडिकल टीमकडून खेळाडूंचे दुखापत अहवाल आणि अपडेट्स मिळाल्यानंतर निवड समितीने हे बदल केले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियातील पहिल्या अॅटलेड कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. बीसीसीआयकडून विराटला पॅटर्निटी लीव्ह मंजूर झाली आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया संघासाठी निवड न केल्याबद्दल गेल्या काही दिवसात बरीच चर्चा सुरू आहे. रोहितचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी यावर नाराजी व्यक्त केली होती. रोहितला दुखापतीमुळे संघात घेतले नाही असे समजले जात होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. रोहित शर्माला दुखापतीचे कारण देत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली तेव्हा रोहित शर्मा दुखापतीमुळे अनफिट असल्याचे कारण देत त्याला वगळ्यात आले. रोहित शर्माला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा आयपीएलच्या अखेरच्या लीग मॅचमध्ये हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरला होता. यावरुन बीसीसीआय आणि निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय झाला आहे.

बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहित शर्माच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी याबाबत निवड समितीला कळविले आहे. रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या कसोटी संघात रोहितचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ईशांत शर्मा पूर्णपणे फिट झाल्यानंतर त्याला कसोटी संघात समाविष्ट करुन घेतले जाणार आहे. तर खांद्याच्या दुखापतीमुळे फिरकीपटू वरुण चक्रवर्ती टी-२० मालिकेमधून बाहेर पडला आहे. निवड समितीने त्याच्या जागी टी नटराजनचा समावेश केला आहे. युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर येणार नाही कारण तो अजूनही गोलंदाजीवर वैद्यकीय टीम सोबत काम करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments