सायना नेहवाल ही ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिने २०१२ मधल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या दोघही मालदीवमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत असून लवकरच नवीन स्पर्धेची तयारी सुरु करणार आहेत. लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी हे दोघंही मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहेत. १४ डिसेंबर २०१८ मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. या आनंदाच्या क्षणाचा फोटो पारुपल्ली कश्यपने इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
पारुपल्ली कश्यपने दोघांचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो टाकला आहे. यामध्ये त्याने आपल्या आयुष्यात काहीही झालं तरीही आपण दोघं मिळून त्याचा सामना करू शकतो असे गोड कॅप्शनही दिले आहे. या फोटोत समुद्रकिनारी दोघंही दिसत असून सूर्यास्तापूर्वीचा हा फोटोची झलक वाटते आहे. त्याचबरोबर सायना नेहवाल हिनेदेखील दोघांचा एक शानदार फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सायना नेहवालने दोघांचा लग्नाच्या पार्टीतला फोटो अपलोड केला आहे. सायनाने यामध्ये ऑरेंज रंगाचा लेहंगा घातला असून कश्यपने पिवळा कुर्ता घातला आहे. या फोटोला तिनं ‘मी जशी आहे तशी स्वीकारल्याबद्दल धन्यवाद’ असे कॅप्शन दिले आहे. लग्नाच्या पार्टीमधला फोटो शेअर करण्याबरोबरच तिने मालदीवमधील हॉटेलच्या रूमचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत शानदार लाल फुग्यांची सजावट, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या, केक आणि रिंग दिसून येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला पारुपल्ली कश्यप कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे काही काळ त्याला आयसोलेशन मध्ये राहावे लागले होते. त्याच्याबरोबर एच. एस. प्रणॉय, आरएमव्ही गुरु साई दत्त आणि प्रणव जेरी चोप्रा हे तिघंही पॉझिटिव्ह आढळले होते. पण सायना नेहवाल या सर्वांमध्ये कोरोना निगेटिव्ह आढळून आली होती. परंतु आत्ता पारुपल्ली कश्यप याची तब्ब्येत व्यवस्थित असून ती दोघ सेलीब्रेशनसाठी मालदीवला पोहोचली आहेत.
सायना नेहवाल हिची कारकीर्द बघता तिला भारत सरकारकडून ४ पुरस्कार मिळाले आहेत. २००९ मध्ये त्यांनी बॅडमिंटनसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला तर एक वर्षानंतर २०१० मध्ये तिने पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न जिंकले, जे भारतातील सर्वात मोठे क्रीडा सन्मान आहे. खेळात उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला २०१६ मध्ये सर्वोत्कृष्ट समाजाला जाणा-या पद्मभूषण पुरस्काराने भूषविण्यात आले.