Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket आजपासून तिकीट विक्री सुरु

आजपासून तिकीट विक्री सुरु

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या सामान्याची तिकिटे ऑनलाईन विक्रीसाठी आजपासून उपलब्ध असणार आहे. तामिळनाडू क्रिकेट संघाने स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देणार असल्याचे सांगितले आहे. सामान्य नागरिकांसाठी तिकिट इनसाइडर डॉट इन आणि पेटीएम डॉट इन या संकेतस्थळांशिवाय पेटीएम अॅप आणि पेटीएम इनसाइडर अॅपच्या माध्यमातून सोमवारी सकाळी १० वाजता तिकिट विक्री सुरू झाली आहे. तिकिटाची किंमत १००  ते २००  रूपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मालिकेचे आयोजन बायो बबलमध्ये करण्यात आले आहे. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चेन्नईमध्ये खेळला जाणारा सामना पाहण्याकरता ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली असून त्यासाठी तिकिटाची विक्री आजपासून सुरू होणार आहे.

दोन टेस्ट मॅचनंतर दोन्ही संघ अहमदाबादला रवाना होणार आहे. तिसरा आणि चौथी कसोटी अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमला होणार आहे. २४-२८ फेब्रुवारी दरम्यान होणारा तिसरा कसोटी सामना डे-नाईट खेळवण्यात येणार आहे. दिलेल्या माहितीनुसार सामन्यासाठी तब्बल १५,००० तिकिटांची विक्री केली जाईल. मालिकेच्या सलामीच्या कसोटी सामन्यात प्रवेशासाठी बंदी घातलेल्या माध्यमांनाही दुसऱ्या सत्रात प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मोटेरा स्टेडियमवर दिवस/रात्र खेळला जाईल. मालिकेचा चौथा सामनाही याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्याने मोटेरा कसोटी सामन्यात चाहत्यांना प्रवेश मिळेल याची पुष्टी केली. “हो, आमच्या शेकडो क्रिकेटप्रेमी चाहत्यांसाठी स्वागत चिन्हे म्हणून आता त्यांना मोटेरा टेस्टसाठी स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात येईल,” असे या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात, क्रीडा मंत्रालयाने आपल्या मानक कार्यप्रणालीमध्ये बदल केला होता आणि COVID-१९ प्रोटोकॉलनंतर स्टेडियम पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली होती.

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम आणि अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात चाहत्यांच्या एंट्रीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. १३ फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंडमधील दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी चेपॉक स्टेडियमचे तीन स्टॅण्ड- I, J आणि K २०१२ नंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांसाठी उघडले जातील. २०११ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विविध कारणांमुळे या स्टेडियमचे तिन्ही स्टँड्स बंद ठेवण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments