भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि टी-२० मालिकेत त्यांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीत झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एखाद्या व्यक्तीचे स्थान मनातून कधीही जात नाही तसेच भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी बद्दल आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये धोनीचे चाहते मैदानात एक पोस्टरवर त्याला खूप मीस करत असल्याचे सांगत आहेत.
महेंद्र सिंह धोनी ला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदुर प्रसिद्ध आहे. एम.एस धोनी या नावाने तो सुपरीचीत आहे. क्रिकेट जगतात त्याने आपल्या भारताचे नाव जगभर उंचावले आहे. रांची सारख्या लहान गावातुन निघुन एक महान क्रिकेटपटु होण्यापर्यंत धोनी ला अनेक संघर्षाना तोंड द्यावे लागले आहे. या संघर्षामधुन निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी पोहोचलाय. जगापुढे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा विराटने सांगितले होती की, धोनीच माझा कर्णधार असेल. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांच्या मनावर तो अजूनही राज्य करतोय. फक्त चाहतेच नाही तर भारतीय संघातील खेळाडू सुद्धा त्याला मीस करत असतात. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याआधी तो जुलै २०१९ मध्ये वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. धोनीच्या निवृत्तीनंतर विराटने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसला होता. आपल्या खेळातील आक्रमक शैलीमुळे त्याने विशेष ओळख तयार केली. धोनी भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या संघाचे चांगले नेर्तृत्व केले आणि अनेक सामन्यांमधे भारताला विजय मिळवुन दिला. या व्यतिरीक्त त्यांच्या नेर्तृत्वात अनेक नोंदी देखील आहेत. विशेष पुरस्काराने त्याला गौरवण्यात सुद्धा आले आहे.
सिडनीत झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सिडनी मैदानावरील चाहत्यांच्या हातात एक पोस्टर दिसत आहे. त्यात मीस यू एम एस धोनी असे लिहले होते. धोनी प्रसिद्धी पाहता या गोष्टी वारंवार मैदानामध्ये घडत असतातच. तो निवृत्त झाल्यानंतर याआधी देखील अनेकदा अशा पद्धतीचे पोस्टर मैदानावर दिसले. पण हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे, या पोस्टरवर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये विराटने इशारा करत म्हटले आहे की, तो देखील धोनीला खुप मीस करत आहे. विराटने मी टू असा इशारा केल्याचे व्हिडिओत दिसतेय. त्यामुळे एकाच कार्यक्षेत्रात काम करत असून सुद्धा एकमेकांबद्दल असणारे आपुलकी यातून दिसून येते. कोहलीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे प्रेक्षकांमध्येही एक खुशीचे वातावरण निर्माण झाले.