Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket झिवा धोनीची अभिनय क्षेत्रात उडी

झिवा धोनीची अभिनय क्षेत्रात उडी

धोनी आता क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. तरीही त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी झालेली नाही. आजही अनेक कंपन्यांना तो त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी हवा असतो. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत धोनीवर चित्रीत झालेल्या अनेक जाहिराती सर्वांनी पाहिल्या आहेत. आयपीएल स्पर्धेनंतर पुन्हा एकदा रोजच्या प्रसिद्धी पासून धोनी दूर गेला आहे.  क्रिकेट वर्ल्ड २०१९ नंतर धोनी वर्षभरापेक्षा जास्त काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२० या दिवशी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. सध्या धोनी हा चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल टीमचा कॅप्टन आहे. धोनीनं रांचीतल्या फार्म हाऊसमध्ये शेतीचे प्रयोग सुरु केले आहेत. त्याच्या फार्म हाऊसमधील भाज्या या दुबईमध्ये विकल्या जातात. धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इनिंग संपलेली असली तरी तो रिटायरमेंटनंतरच्या नव्या इनिंगमध्येही व्यस्त आहे. मात्र जाहिरात विश्व त्याला विसरलेलं नाही.

धोनीबरोबरच त्याची पाच वर्षाची मुलगी झिवा ही देखील एका जाहिरातीमध्ये नुकतीच झळकली आहे. एका प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीसाठी आता धोनीसह त्याची मुलगी झिवा हिलाही अभिनयाची संधी मिळाली आहे. झिवाला वयाच्या पाचव्या वर्षीच आपली पहिली जाहिरात मिळाली आहे. बाबा धोनी आणि मुलगी झिवा हे दोघेही एका ख्यातनाम अशा उत्पादनाच्या जाहिरातीत दिसत आहेत. झिवा जन्मापासूनच चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर डिझायनंर कपडे घालून अनोख्या अंदाजात नेटकऱ्यांची मनं जिंकणं असो,  किंवा मग एखाद्या व्हिडीओतून खुद्द बाबा माहिलाही टक्कर देणं असो, झिवा कायमच सर्वांच लक्ष वेधते. धोनी आणि साक्षीसोबतचे अनेक व्हिडीओ तिच्या या इन्स्टा अकाऊंटवर असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियामध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर झिवाने आता जाहिरातीच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. झिवाची धोनीबरोबरची पहिली जाहिरात आता तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.  धोनीची पाच वर्षांची मुलगी झिवा ही वडिलांप्रमाणेच लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १.८  मिलियन फॉलोअर्स आहेत.

धोनी आणि झिवा यांनी कॅडबरी ओरिओ बिस्कीटच्या  जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहेत. ही जाहिरात नुकतीच सोशल मीडियावर झळकली असून त्यामधील वडील-मुलीची केमिस्ट्री चांगलीच लोकप्रिय होत आहे. वडील- मुलीची ही जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये असून,  झिवाचा अभिनय पाहून नेटकरीही खुश झाले आहेत. अवघ्या पाच वर्षांच्याच वयात धोनीच्या मुलीने अर्थात झिवानं तिच्या अभिनयानं वडिलांनाही चांगलीच टक्कर दिली आहे. ओरिओ इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ही जाहिरात शेअर करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments