Thursday, February 25, 2021
Home Tech News आयफोन ॲपलला ८८ कोटींचा दंड

आयफोन ॲपलला ८८ कोटींचा दंड

जगप्रसिद्ध अमेरिकन स्मार्टफोन कंपनी ॲपल ने दावा केला की, त्यांचे वेगवेगळे आयफोन मॉडेल हे वॉटरप्रूफ असून चार मीटर पर्यंतच्या खोलीतल्या पाण्यात ३० मिनिटांपर्यंत काहीही बिघाड न होता राहू शकतात. वॉटरप्रूफ असल्याच्या दाव्यावर टीका करत, एजीसीएमने म्हटले आहे की हे दावे काही विशिष्ट परिस्थितीतच खरे आहेत. एसीजीएमने निवेदनात म्हटलं आहे की, ॲपलचा डिस्ल्केमर लोकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. कारण त्यात लिक़्विड डेमेज म्हणजेच पाण्यामुळे नुकसान झाल्यास आयफोनला वॉरंटी मिळणार नाही, असे म्हटले आहे.

अमेरिकन स्मार्टफोन कंपनी ॲपलने  आयफोन मॉडेलबद्दल खोटा दावा केल्याने, आता कंपनीला १० दशलक्ष युरो, म्हणजे जवळपास ८८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीच्या अँटी ट्रस्ट अथोरिटीने ॲपलला हा दंड ठोठावला आहे. इटलीच्या अँटी ट्रस्ट ऑथॉरिटीने सांगितलं की, ॲपल कंपनीने आयफोन मॉडेल वॉटरप्रूफ असल्याचा खूपच प्रचार केला आहे. परंतु कंपनीच्या डिस्क्लेमरमध्ये असं म्हटलं आहे की, जर कुठल्या द्रवपदार्थामुळे फोनचं नुकसान झाल्यास वॉरंटी दिली जाणार नाही. तसंच आयफोनची वॉटरप्रूफ नोंदणी वैशिष्ट कोणत्या परिस्थितीत कार्य करेल हे सांगण्यात आलेलं नाही. ग्राहकांसाठी ही एक प्रकारची फसवणूकच आहे. विशेष म्हणजे आयफोनच्या वॉटरप्रूफ क्षमतेबद्दल दिशाभूल करणारे खोटे दावे केल्याबद्दल कंपनीला सोमवारी दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला जुन्या आयफोनचा स्पीड कमी केल्याबद्दलही दंड ठोठावण्यात आला होता. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये ॲपलला ११३ दशलक्ष म्हणजे जवळपास ८३८.९५ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. हा दंड अमेरिकेतील ३३ राज्य आणि कोलंबियामध्ये केलेल्या आरोपांसाठी आहे.

बॅटरी संबंधित समस्या लपवण्यासाठी २०१७ मध्ये जुन्या आयफोनची गती कमी करण्याचा कंपनीवर आरोप आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना नवीन मॉडेल खरेदी करणे भाग पडेल. ज्या वेळी लोकांनी याबाबत तक्रार नोंदवली, त्यावेळी कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात, बॅटरीमुळे फोनला त्रास होऊ नये आणि फोन बंद होऊ नये त्यासाठी हे बदल केल्याचं सांगितलं. कंपनीचा हा दावा न पटल्याने अमेरिकेच्या सुमारे ३४ राज्यांनी कंपनी विरोधात चौकशी सुरू करण्याचा आणि न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जुन्या फोनचा स्पीड कमी करून लोकं नवीन महागडा आयफोन खरेदी करू शकतील या हेतूने कंपनीने या सर्व गोष्टी केल्या आहेत, लोकांना नवीन आणि महागडा आयफोन खरेदी करण्यास भाग पाडले आहे असं अनेक राज्यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments